नाल्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 23:58 IST2019-03-17T23:58:12+5:302019-03-17T23:58:28+5:30
नाल्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री 11.30 वाजता उघडकीस आली.

नाल्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू
खामगाव : नाल्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री 11.30 वाजता उघडकीस आली. सुटाळा खुर्द येथील नऊ वर्षाचे दोन मुले सकाळपासून गायब होती नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता ते कुठेही आढळून आले नाही. तरी शोधकार्य सुरू होते अखेर रात्री साडे अकरा वाजता सुटाळा बु. नाल्यात त्यांचा मृतदेह आढळला. राजेंद्र भीमराव पवार वय 9 वर्ष रा. सुटाळा खुर्द व भागवत किशोर डवंगे वय 9 वर्ष रा. सुटाळा खुर्द अशी मुलांची नावे आहेत.