मेहकरातून पिस्तूलासह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 11:00 IST2021-07-29T11:00:40+5:302021-07-29T11:00:47+5:30

Crime News : एक गावठी पिस्तूल व एक चाकू जप्त करण्यात आला आहे.

Two arrested with pistol from Mehkar | मेहकरातून पिस्तूलासह दोघांना अटक

मेहकरातून पिस्तूलासह दोघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर: लुटमार तथा मारहाण करण्याच्या दृष्टीकोणातून अवैधरित्या शस्त्र जवळ बाळगणाऱ्या दोघांना मेहकर पोलिसांनी २७ जुलै रोजी अटक केली. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल व एक चाकू जप्त करण्यात आला आहे.
मेहकर शहरातील आठवडी बाजार परिसरात तीन संशयीत लोक शस्त्रांसह फिरत असल्याची माहिती २७ जुलै रोजी मेहकर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सायंकाळी सात वाजता पोलिसांनी कारवाई केली. आठवडी बाजार परिसरात तालुक्यातील बरटाळा येथील रहिवासी जेरु परात्या भोसले (२०) राहुल श्रीरंग पवार (२०)व अमोल भोसले हे संशयित रित्या फिरत होते. त्यांना पकडण्यासाठी पोलिस गेले असता झटापडीत अमोल परात्या भोसले घटनास्थळावरून फरार झाला. पाठलाग करूनही तो हाती लागला नाही. दरम्यान उर्वरित दोघांकडून ३० हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तूल व एक चाकू पोलिसांनी जप्त केला आहे. प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल गणेश लोढे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: Two arrested with pistol from Mehkar