भरधाव ट्रक पुलावरून कोसळला; एक ठार, दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 16:11 IST2018-05-24T16:11:05+5:302018-05-24T16:11:05+5:30
खामगाव: आंबे वाहून नेणारा भरधाव ट्रक निर्माणाधीन पुलानजीक कोसळून झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोन जण जखमी झाले.

भरधाव ट्रक पुलावरून कोसळला; एक ठार, दोन जखमी
खामगाव: आंबे वाहून नेणारा भरधाव ट्रक निर्माणाधीन पुलानजीक कोसळून झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोन जण जखमी झाले. ही घटना गुरूवारी पहाटे ४ वाजता दरम्यान घडली. या अपघातील जखमींना अकोला येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे.
एम.पी.-१३- एच- ०९४० हा ट्रक उज्जैनकडे जात होता. दरम्यान, कोलोरी नजीक मोठ्या पुलाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव ट्रक निर्माणाधीन पुलांच्या कॉलमजवळ कोसळला. यामध्ये जगदीश बाळू बंजारा (३२), अर्जून काशीराम बंजारा (३५), कमल कैलाश भिलाला हे तिघेजण गंभीर जखमी झाले. जखमींना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात नेत असतानाच अर्जून काशीराम बंजारा या जखमीचा वाटेतच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार रफीक शेख आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, उलटलेल्या ट्रकमधील आंब्याचे कॅरेट नागरिकांनी संधी साधून पळवून नेले. पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत या ट्रकमधील अनेक कॅरेट गायब झाल्याची चर्चा आहे.