आदिवासी अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 12:55 IST2018-11-10T12:54:30+5:302018-11-10T12:55:38+5:30

संग्रामपुर: तालुक्यातील वसाळी येथे एका आदिवासी अल्पवयीन गतीमंद मुलीवर २७ वर्षीय युवकाने अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी घडली.

tribal girl raped in sangrampur taluka | आदिवासी अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार

आदिवासी अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार

संग्रामपुर: तालुक्यातील वसाळी येथे एका आदिवासी अल्पवयीन गतीमंद मुलीवर २७ वर्षीय युवकाने अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणी सोनाळा पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.
वसाळी ता.संग्रामपूर येथे राम भारत पालकर (वय २७) याने शुक्रवारी संध्याकाळी सुमारे साडेचार वाजता गावातीलच आदिवासी अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून तिच्या घरात प्रवेश केला. मुलीचे आई, वडील व बहिणी शेतात गेले होते. मुलगी घरी एकटी असल्याचे पाहुन या युवकाने तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार मुलीने घरी सांगितल्यानंतर मुलीच्या मोठ्या वडीलांनी सोनाळा पोलीसात फिर्याद दाखल केली. याप्रकरणी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक वाघमोळे, श्याम कपले, गजानन सावंत, व गजानन तायडे हे करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: tribal girl raped in sangrampur taluka