अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी आरोपीस तीन वर्षांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 16:53 IST2018-09-19T16:53:03+5:302018-09-19T16:53:13+5:30
खामगाव : ८ वर्षीय मुलीच्या विनयभंग प्रकरणातील एका आरोपीस जिल्हा व सत्रन्यायालयाने ३ वर्षांची शिक्षा सुनावली. हा महत्वपूर्ण निकाल खामगाव सत्र न्यायालयाने बुधवारी दुपारी दिला.

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी आरोपीस तीन वर्षांची शिक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : ८ वर्षीय मुलीच्या विनयभंग प्रकरणातील एका आरोपीस जिल्हा व सत्रन्यायालयाने ३ वर्षांची शिक्षा सुनावली. हा महत्वपूर्ण निकाल खामगाव सत्र न्यायालयाने बुधवारी दुपारी दिला.
खामगाव तालुक्यातील शहापूर येथील एक आठ वर्षांची मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधून श्रीकृष्ण पाचपोर (१९) याने ४ जून २०१३ रोजी तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी आरोपी विरोधात कलम ३५४, ४५२ व पोक्सो अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. प्रकरण न्यायप्रविष्ठ झाल्यानंतर न्यायालयाने सहा साक्षीदार तपासले. यामध्ये पिडीत मुलगी आणि तिच्या आईची साक्ष महत्वाची ठरली. बुधवारी याप्रकरणी न्यायमूर्ती पथाडे यांच्या न्यायालयासमोर सुनावनी झाली. यात आरोपी युवकास ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा तसेच सहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.