खामगावात तलवारीच्या हल्ल्यात तीघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 15:51 IST2020-03-17T15:51:33+5:302020-03-17T15:51:39+5:30
तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना एकता नगरात घडली.

खामगावात तलवारीच्या हल्ल्यात तीघे जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: मशीदीचा रस्ता वापरण्याच्या कारणावरून एकाच समाजाच्या दोन कुटुंबात वाद झाला. या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. यावेळी तलवारीचा वापर करण्यात आल्याने तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना एकता नगरात घडली. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकता नगरातील नाजीया परवीन मो. फिरोज ही महिला पती आणि मुलींसह शनिवारी घरात होती. त्यावेळी त्यांच्या शेजारी राहणारे आबीद अली, गुलाम अली, त्यांचा मुलगा आजम अली दुसरा मुलगा अशरफ अली आणि मुलगी शहजादी सहेर हे चौघे घरासमोर आले. मशीदीचा रस्ता वापरण्याच्या कारणावरून विवाहितेला शिविगाळ केली. या प्रकरणाची माहिती शेजारी आणि समाजातील ज्येष्ठांना मिळताच त्यांनी हे प्रकरण आपसात मिटविले. त्यानंतर या घटनेची माहिती विवाहितेचा भाऊ मो. शोएब रा. झिरा बावडी, अकोला यास मिळाली. त्यानंतर तो आपल्या तीन-चार मित्रांसह अकोला येथून तिच्या घरी आला.
यावेळी विवाहितेच्या भावाला आणि मित्रांना पाहून पुन्हा वाद निर्माण केला. त्यानंतर आजम अली याने तिच्या भावाला तलवारीने खांद्यावर वार करून जखमी केले. तसेच इतरांनी विवाहितेला आणि तिच्या पतीला लोखंडी पाईप आणि लोखंडी सळईने मारहाण केली. याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून उपरोक्त चौघांविरोधात भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.
(प्रतिनिधी)