डोणगाव पोलीस स्टेशनचे तीन कर्मचारी बनले पोलीस उपनिरीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:32 IST2021-02-12T04:32:23+5:302021-02-12T04:32:23+5:30
डोणगाव पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे विष्णू कैलास बोडखे हे २०१० मध्ये पोलीस खात्यात भरती झाले होते. त्यानंतर त्यांनी ...

डोणगाव पोलीस स्टेशनचे तीन कर्मचारी बनले पोलीस उपनिरीक्षक
डोणगाव पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे विष्णू कैलास बोडखे हे २०१० मध्ये पोलीस खात्यात भरती झाले होते. त्यानंतर त्यांनी खात्यांतर्गत २०१७ मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली होती. सोबतच ५ डिसेंबर २०२० रोजी शारीरिक चाचणीही झाली होती. त्याचा निकाल १० फेब्रुवारी रोजी लागला. त्यात ते उत्तीर्ण झाले. त्यांच्या सोबतच डोणगाव पोलीस ठाण्यात कार्यरत शेख अख्तर शेख सत्तार व नानाभाऊ काशीनाथ काकड हे दोघेही ही परीक्षा उत्तीण झाले आहे. राज्यात या तिघांची अनुक्रमे १७वी, ११२वी आणि नानाभाऊ काकड यांची २०७ वी रॅंक आली आहे. त्यांना डोणगावचे ठाणेदार दीपक पवार यांचे मार्गदर्शन लाभले होते. त्यांच्या या यशाबद्दल ठाणेदार दीपक पवार, पीएसआय शिवाजी राठोड, एएसआय अशोक नरोटे, पवन गाभणे, नितीन खराडे, अंभोरे, परसूवाले यांनी स्वागत केले आहे.