शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

वैरणास आग लागून हजारोंचे नुकसान

By admin | Updated: April 14, 2017 00:02 IST

इसोली : धानोरी येथे जनावरांसाठी ठेवलेल्या वैरणास आग लागल्याने नुकसान झाल्याची घटना गुरुवारी घडली.

इसोली : धानोरी येथे जनावरांसाठी ठेवलेल्या वैरणास आग लागल्याने नुकसान झाल्याची घटना गुरुवारी घडली. येथे गावातील शेतकऱ्यांनी जनावरांच्या चाऱ्यासाठी वैरण गोळा करून ठेवली होती. मात्र, गुरुवारी अचानक वैरणाला आग लागली. यावेळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, तोपर्यंत आगीत कडबा- कुटार भस्मसात झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. गावातील शेतकऱ्यांनी गुरा-ढोरासाठी कडबा, कुटार, सोयाबीन कुटार, मका कुटाराच्या गंज्या सरकारी ई क्लास मोकळ्या जागेवर लावलेल्या होत्या. १३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता अचानक कुटारांच्या गज्यांना आग लागल्याने सर्व गुरा-ढोरांच्या वैरणाच्या गंज्या जळून खाक होऊन शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. अखेर चिखली येथील नगर परिषद दलाच्या गाडीला पाचारण करुन आग नियंत्रणात आणावी लागली आहे. या आगीमुळे कोणत्याही गुरांची जीवित हानी झाली नसली, तरी जनावरांच्या वैरणाचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. यासाठी धानोरी येथील जनावरांच्या वैरणासाठी शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी गावकरी व शेतकऱ्यांकडून होत आहे. तीन एकर शेतातील मका जळून खाकधामणगाव बढे : येथील शे.बादर शे. इमाम या शेतकऱ्याच्या शेतातील कापून पडलेली तीन एकर मका तथा सहा एकर शेतातील ठिबक सिंचन सामान १२ एप्रिलच्या रात्री जळून खाक झाले. त्यामध्ये या शेतकऱ्याचे १ लाख ६५ हजार रुपयांचे नुकसान झाले. शे.बादर यांनी नुकताच तीन एकरमधील मका कापून ठेवला होती. तसेच कपाशीमधील ठिबक सिंचनचे सामान जमा करून ठेवले होते. आगीचा पंचनामा तलाठी भारसाकळे यांनी केला.