शेजारच्या युवकाने केलेली चोरी झाली उघड; वाडी येथील चोरीचा लागला तपास

By सदानंद सिरसाट | Updated: August 25, 2023 18:06 IST2023-08-25T17:45:50+5:302023-08-25T18:06:41+5:30

शहरानजीकच्या वाडी येथील एका घरात झालेल्या चोरीचा अवघ्या काही तासांत पोलिसांनी छडा लावला आहे.

theft by the youth of the neighborhood was revealed theft at Wadi was investigated | शेजारच्या युवकाने केलेली चोरी झाली उघड; वाडी येथील चोरीचा लागला तपास

शेजारच्या युवकाने केलेली चोरी झाली उघड; वाडी येथील चोरीचा लागला तपास

खामगाव (बुलढाणा) : शहरानजीकच्या वाडी येथील एका घरात झालेल्या चोरीचा अवघ्या काही तासांत पोलिसांनी छडा लावला आहे. घराशेजारी भाड्याने राहणाऱ्या युवकानेच घरातील ऐवजावर हात साफ केल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याच्याकडून ६ हजार रुपये तसेच सोन्याचा चपला हार जप्त केला आहे. वाडी येथील प्रवीण केशवराव तायडे (३२) यांच्या पत्नी २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी घराला कडी लावून मुलांना ट्यूशन क्लासला सोडायला गेल्या होत्या. या संधीचा फायदा घेत चोरट्याने घरात प्रवेश केला. कपाटातील रोख ८,१०० रुपये आणि २१ ग्रॅमचा सोन्याचा

चपला हार असा एकूण १ लाख ५० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची तक्रार तायडे यांनी केली. त्यावरून शहर पोलिसांनी गुन्हा नोंदविला. फिर्यादीने संशय व्यक्त केल्याने तायडे यांच्या घराशेजारी भाड्याने खोली करून राहणारा योगेश रामेश्वर जोहरी (३५) याला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली. यावेळी त्यानेच चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचे ६ हजार रुपये व सोन्याचा चपला हार जप्त केला.

Web Title: theft by the youth of the neighborhood was revealed theft at Wadi was investigated