खामगावातील रेल्वे स्थानकातून ट्रकची चोरी

By अनिल गवई | Updated: October 26, 2023 16:33 IST2023-10-26T16:33:04+5:302023-10-26T16:33:49+5:30

साडेसात लाख रूपये किंमतीचा ट्रक २२ ऑक्टोबरच्या रात्री चोरीला गेला. चोरी गेलेल्या ट्रकचा सर्वत्र शोध घेण्यात आला.

The theft of a truck from the railway station in Khamgaon | खामगावातील रेल्वे स्थानकातून ट्रकची चोरी

खामगावातील रेल्वे स्थानकातून ट्रकची चोरी

खामगाव येथील मालधक्क्यावरून एक ट्रक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी शहर पोलीसांनी तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.

याबाबत सविस्तर असे की, ट्रकचालक राजेंद्र रामभाऊ गवई (३४) रा. बाळापूर फैल यांनी शहर पोलीसांत तक्रार दिली आहे. त्यामध्ये मालधक्क्यांवरून सिमेंट नेण्यासाठी त्यांनी एमएच ०६ एक्यू ६१५१ क्रमांकाचा ट्रक आणला. येथील मोकळ्या जागेवर ट्रक उभा केला.

साडेसात लाख रूपये किंमतीचा ट्रक २२ ऑक्टोबरच्या रात्री चोरीला गेला. चोरी गेलेल्या ट्रकचा सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र, ट्रक मिळून न आल्यामुळे ट्रकचालक गवई यांनी शहर पोलीसांत तक्रार दिली. या तक्रारीवरून शहर पोलीसांनी अज्ञात चोरट्या विरोधात भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

Web Title: The theft of a truck from the railway station in Khamgaon