नाेकरानेच लंपास केले दीड लाखाचे दागिने

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 05:53 PM2023-12-10T17:53:51+5:302023-12-10T17:54:16+5:30

देऊळगावराजा : शहरातील सराफा लाईनमध्ये असलेल्या ज्वेलर्समध्ये असलेल्या नोकरानेच दीड लाखाचे दागिने लंपास केले. याप्रकरणी आराेपी नोकराविरुद्ध पाेलिसांनी १० ...

The servant looted jewelry worth one and a half lakh | नाेकरानेच लंपास केले दीड लाखाचे दागिने

नाेकरानेच लंपास केले दीड लाखाचे दागिने

देऊळगावराजा : शहरातील सराफा लाईनमध्ये असलेल्या ज्वेलर्समध्ये असलेल्या नोकरानेच दीड लाखाचे दागिने लंपास केले. याप्रकरणी आराेपी नोकराविरुद्ध पाेलिसांनी १० डिसेंबर राेजी गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील सराफा लाईनमध्ये गोविंद गजानन तिडके यांचे गोविंद ज्वेलर्स नावाचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. त्यांच्या दुकानामध्ये असलेला नोकर आरोपी अनिल महादू पवार (रा. देऊळगावराजा) हा दुकानावर काम करीत होता. दुकानामध्ये असलेला सोन्या-चांदीचे दागिने, १०० ग्रामचे ब्रासलेट (किंमत ३० हजार), पन्नास ग्रामचे ब्रासलेट-पाच नग (किंमत २५ हजार), ब्रासलेट दोन (पंधरा हजार), अंगठ्या (किंमत आठ हजार), चांदीच्या चेन पट्ट्या (चोवीस हजार), चांदीचे इतर दागिने (३२ हजार), असा एकूण एक लाख पंचावन्न हजारांचा मुद्देमाल आरोपीने लंपास केला. दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, सदर प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी देऊळगावराजा पाेलिसांनी आराेपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक हेमंत शिंदे करीत आहेत.

Web Title: The servant looted jewelry worth one and a half lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.