शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

Bhendwal Bhavishyavani: देशाच्या प्रधानावर आर्थिक संकट येणार अन् अडचणींचा सामना, भेंडवड घटमांडणीचं भाकित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2022 10:22 AM

सातेतीनशे वर्षांची परंपार असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवडची घटमांडणी पार पडली. यामध्ये घटमांडणीचे भाकित आज जाहीर करण्यात आले आहे.

भेंडवळ-

सातेतीनशे वर्षांची परंपार असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवडची घटमांडणी पार पडली. यामध्ये घटमांडणीचे भाकित आज जाहीर करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवडच्या या भविष्यवाणीकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं होतं. भेंडवड घटमांडणीनुसार यंदा जून आणि जुलै महिन्यात पाऊस साधारण प्रमाणात पडेल. तर ऑगस्ट महिन्यात चांगला आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस जास्त असेल असं भाकित वर्तवण्यात आलं आहे.

देशात आर्थिक टंचाई भासणार असल्याचं सांगितलं आहे.सर्वत्र प्रसिद्ध असणाऱ्या भेंडवडच्या घट मांडणीचे निष्कर्ष आज सकाळी जाहीर झाले आहेत. यात देशावरील संकटाच्याबाबतीत महत्वाची भविष्यवाणी करण्यात आली आहे. देशाच्या प्रधानावर आर्थिक संकट येणार असल्याचं भाकित करण्यात आलं आहे. देशाच्या संरक्षण खात्यावर दबाव, ताण राहणार आहे. देशात घुसखोरीचा प्रभाव कायम राहणार आहे. राजाला अनेक अडचणींचा, तणावाचा सामना करावा लागेल, असं नमूद करण्यात आलं आहे. देशाच्या राजासमोर संकटं आली तरी राजाची गादी कायम राहणार असल्याचंही भाकित वर्तविण्यात आलं आहे. 

काय आहे भेंडवडची भविष्यवाणी?पर्जन्यमान, पिकांची स्थिती, शेतीमालाचे दर, देशातील राजकीय आणि आर्थिक स्थितीबाबत भेंडवडमध्ये दरवर्षी भविष्यवाणी करण्यात येते. गेल्या 350 वर्षांपासून या घट मांडणीच्या आधारावर वर्षभराचं राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि हवामानाचं भविष्य वर्तवलं जातं.

भेंडवडच्या या घट मांडणीच्या निष्कर्षाला 350 वर्षांची परंपरा आहे. ही घट मांडणी ऐकण्यासाठी दरवर्षी गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, मराठवाडा, खान्देश या ठिकाणाहून विविध शेतकरी येतात. अक्षय्य तृतीये च्या दुसऱ्या दिवशी  हे भाकित सांगितलं जातं. 350 वर्षांपूर्वी महान तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी ही परंपरा सुरू केली होती, जी त्यांचे वंशज आजही पुढे चालवत आहेत. 

सारंगधर महाराज वाघ यांनी हे भाकित व्यक्त केलं आहे. शेती आणि पावसाविषयक निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास गुढीपाडवा ते अक्षय्य तृतीया या काळात करुन वर्षभराची भाकिते या घट मांडणीत करण्यात येतात. या भविष्यवाणीवर शेतकऱ्यांचा खूप विश्वास आहे.

जून-जुलैमध्ये साधारण पाऊस आणि सप्टेंबरमध्ये जास्त पाऊसजून  आणि जुले महिन्यात साधारण पाऊस पडेल  ऑगस्ट महिन्यात चांगला तर सप्टेंबर महिन्यात जास्त होईलविशेष म्हणजे अवकाळी पाऊस ही राहणार आहे. वार्षिक पीक परिस्थितीचे भाकीत - तूर चांगले पीक या वर्षात तूर हे सर्वात चांगले येणारे पीक असेल तर कपाशीचे पीक हे कुठे कमी कुठे अधिक सर्वसाधारण राहील. अतिवृष्टी आणि जास्त पावसामुळे ज्वारीचे पीक साधारण असून या पिकांची नासधूस होण्याची शक्यता जास्त आहे. 

मुगाचे पीक सुद्धा साधारण असून उडदाचे पीक साधारण राहील आणि या पिकाची सुद्धा नासाडी वर्तवण्यात आली आहे.तीळाला तेजी - तीळ हे तेलवा नसून तेलवर्गीय पीक असून त्याचे भाव साधारण राहतील भादली हे पिक रोगराईचे प्रतीक आहे ह्या वर्षात रोगराईचे प्रमाण अधिक असल्याचे भाकीत करण्यात आले आहे.तांदूळ, ज्वारी, बाजरी, हरभरा साधारण बाजरीचे पीक चांगले राहील मटकी पण साधारण राहील साडी म्हणजे तांदळाचे साधारण चांगले असेल. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊसNarendra Modiनरेंद्र मोदी