पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीत जीव तोडून धावले, मात्र लेखी परीक्षेला मारली दांडी

By भगवान वानखेडे | Published: April 2, 2023 05:04 PM2023-04-02T17:04:02+5:302023-04-02T17:04:28+5:30

लेखी परीक्षेला २७५ उमेदवारांची दांडी, जिल्हा पोलिस शिपाई भरती-२०२१ प्रक्रिया जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

The police recruitment field test was tough, but the written test failed | पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीत जीव तोडून धावले, मात्र लेखी परीक्षेला मारली दांडी

पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीत जीव तोडून धावले, मात्र लेखी परीक्षेला मारली दांडी

googlenewsNext

बुलढाणा - जिल्हा पोलिस शिपाई भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या ५७० उमेदवारांची लेखी परीक्षा २ एप्रिल रोजी सकाळी ११ ते १२.३० या वेळेत शहरातील दोन परीक्षा केंद्रांवर पार पडली. मात्र, पात्र ठरलेल्या ५७० उमेदवारांपैकी २९५ उमेदवार लेखी परीक्षेला हजर राहले. उर्वरीत २७५ उमेदवारांनी परीक्षेला दांडी मारली. तेव्हा मैदानी चाचणीत जीव तोडून धावणारे उमेदवार लेखी परीक्षेला गावले नसल्याचे चित्र आहे.

जिल्हा पोलिस शिपाई भरती-२०२१ प्रक्रिया जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. शहरातील एडेड आणि ज्ञानपीठ शाळा परीक्षा केंद्र होत्या. सकाळी ८ वाजता पासूनच या परीक्षा केंद्राबाहेर उमेदवारांची रेलचेल दिसून येत होती. तर भरती प्रक्रियेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणुन जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी या परीक्षा केंद्रावर बंदोबस्तासाठी १ अपर पोलिस अधीक्षक, २ उपविभागीय पोलिस अधिकारी, १६ पोलिस निरीक्षक, ४५ सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, १५० पोलिस अंमलदार व १५ महिला पोलिस अंमलदार आणि १५ व्हिडीओ कॅमेरे व दोन वाहने असा बंदोबस्त ठेवला होता. ही लेखी परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पडावी म्हणून संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले.

एकाचवेळी अनेक ठिकाणी झाली परीक्षा
पोलीस शिपाई पदासाठी घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत २ एप्रिल लेखी परीक्षा पार पडली. जिल्ह्यात ५१ पोलीस शिपाई पदासाठी मैदानी चाचणी पात्र ठरलेल्या ५७० उमेदवारांपैकी उर्वरीत उमेदवार सोयीच्या इतर ठिकाणी परीक्षेला गेले असली असा अंदाज पोलीस विभागाने वर्तविला आहे.

Web Title: The police recruitment field test was tough, but the written test failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.