७५ वर्षीय वृद्धाची अंगठी चोरणाऱ्यास जळगावमधून अटक
By अनिल गवई | Updated: December 29, 2023 12:58 IST2023-12-29T12:58:24+5:302023-12-29T12:58:59+5:30
यापूर्वीही त्याने असाच प्रकार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

७५ वर्षीय वृद्धाची अंगठी चोरणाऱ्यास जळगावमधून अटक
खामगाव: येथील बसस्थानकावरून एका वृध्दांची अंगठी चोरणाऱ्या चोरट्यास खामगाव पोलीसांनी जळगाव खांदेश येथून अटक केली आहे. दिगंबर कौतिक मानकरे असे आरोपीचे नाव आहे. चोरीची त्याने कबुली दिली असून, यापूर्वीही त्याने असाच प्रकार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
याबाबत सविस्तर असे की, खामगाव येथील बस स्थानकाजवळ भास्कर तुळशीराम मोहे (७५) या वृध्दाची अंगठी हिसकावून आरोपीने पोबारा केला होता. ही घटना २४ डिसेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी मोहे यांच्या तक्रारीवरून शहर पोलीसांनी भादंवि कलम ४२०, ४१९ अन्वये गुन्हा दाखल केला होता. दरम्यान वर्णनावरून शहर पोलीसांनी आरोपीचा छडा लावला. याच आरोपीने मुख्य बाजारपेठेतील एका सराफा दुकानासमोरून ३ नोव्हेंबर २०२३ रोजी अरविंद डॅनिएल काळे यांचीही अंगठी चोरल्याची कबुली आरोपीने दिली. ही कारवाई खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार मोहन करुटले ,पो हे का प्रदीप मोठे, pc रवींद्र कन्नर,पो का प्रमोद बावस्कर, सागर भगत ,गणेश कोल्हे, अंकुश गुरुदेव, राहुल थारकर,यांनी केली आहे.पुढील तपास सुरू आहे. आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.