नागपूर-औरंगाबाद राज्य महामार्गावरच थाटले वाहनतळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 13:50 IST2018-08-20T13:48:52+5:302018-08-20T13:50:02+5:30
डोणगाव (जि. बुलडाणा ) : येथून नागपूर-औरंगाबाद हा राज्यमहामार्ग गेलेला असून येथील बसथांबा रोडला लागूनच आहे. त्यामुळे रोडवर वाहने उभी राहतात. राज्य महामार्गाला वाहनतळाचे स्वरूप येत असून येथे वाहतूकीची कोंडी निर्माण होते.

नागपूर-औरंगाबाद राज्य महामार्गावरच थाटले वाहनतळ
डोणगाव (जि. बुलडाणा ) : येथून नागपूर-औरंगाबाद हा राज्यमहामार्ग गेलेला असून येथील बसथांबा रोडला लागूनच आहे. त्यामुळे रोडवर वाहने उभी राहतात. राज्य महामार्गाला वाहनतळाचे स्वरूप येत असून येथे वाहतूकीची कोंडी निर्माण होते. डोणगाव येथे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोठी बाजारपेठ असून परिसरातील बहुतांश खेडी जोडलेली आहे. येथूनच एसटी महामंडळाच्या अनेक बसफेºया आहेत. या ठिकाणी दररोज शेकडो प्रवासी एसटी बसने ये-जा करतात. परंतु या प्रवासासाठी बसथांबा हा राज्य महामार्गावरच असल्याने एसटी बस चालक, वाहकांना राज्य महामार्गावर बस उभ्या कराव्या लागत असल्याने डोणगाव येथे बस थांबा हा राज्य महामार्ग बनला आहे. डोणगाव येथे प्रवाशांना उभे राहण्यासाठी राज्य महामार्गावर बस थांबा फार पूर्वीपासून आहे. येथे महिला प्रवाशांसाठी कुठलीही सोय नाही. तर विद्यार्थ्यांना राज्य महामार्गावर उभे राहूनच बसची प्रतीक्षा करावी लागते. बसस्थानक नसल्याने बसचालकास बस राज्य महामार्गावर उभी करावी लागत असल्याने अनेकदा वाहतुकीचा खोळंबा होतो. येथील पंचायत समितीपासून आमदार, खासदारापर्र्यंत शिवसेनेची सत्ता आहे, तर परिवहन मंत्री शिवसेनेचेच आहेत. परंतू लोकप्रतिनिधी डोणगाव येथे सुसज्ज बसस्थानक करण्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे प्रवाशांना राज्य महामार्गावर उभे रहावे लागते. (वार्ताहर)