अनियमिततेमुळे शिक्षक निलंबित

By Admin | Updated: October 15, 2015 00:38 IST2015-10-15T00:38:05+5:302015-10-15T00:38:05+5:30

खामगाव तालुक्यातील शिक्षकाचे निलंबन ; कारवाईविरोधात शाळा अघोषित बंद.

Teacher suspended due to irregularity | अनियमिततेमुळे शिक्षक निलंबित

अनियमिततेमुळे शिक्षक निलंबित

खामगाव : अनियमिततेच्या कारणावरून तालुक्यातील लाखनवाडा खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक गजानन जाधव यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या ८ ऑक्टोबर रोजीच्या एका आदेशान्वये निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईच्या विरोधात १४ ऑक्टोबर रोजी विद्यार्थी शाळेत न आल्याने शाळा अघोषित बंद होती. याबाबत प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील लाखनवाडा खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षक गजानन मोतीराम जाधव यांच्यावर वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना करणे, आर्थिक अभिलेखे अद्ययावत नसणे, आर्थिक अनियमितता तसेच पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असणे यावरून गटशिक्षणाधिकार्‍यांनी शिस्तभंगाच्या कारवाईचा अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार झालेल्या चौकशीदरम्यान शिक्षक गजानन मोतीराम जाधव हे दोषी आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, सदर निलंबनाची माहिती गावात पसरल्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी विद्यार्थी शाळेकडे फिरकले नाहीत. त्यामुळे शाळेत शुकशुकाट होता तसेच शाळा अघोषित बंद होती.

Web Title: Teacher suspended due to irregularity