शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
3
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
4
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
5
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
6
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
7
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
8
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
9
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
10
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
11
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
12
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
13
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
14
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
15
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
16
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
17
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
20
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

किडणी आजाराचे पूर्णत: निर्मूलन होईपर्यंत वारी पाणी योजनेचा कर शासनाने भरावा - सुबोध सावजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 9:32 PM

पातुर्डा : खारपाणपट्यातील किडणी आजार पूर्णत: निर्मूलन होईपर्यंत वारी वरुन होणा-या पाणी पुरवठा योजनेचा पाणीकर शासनाने भरावा असा इशारा माजीराज्यमंत्री सुबोध सावजी यांनी दिला आहे. १४० गाव पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचार काढून मुंबई अपघातग्रस्तांप्रमाणे किडनीग्रस्तांना शासकिय मदत द्यावी अशी मागणी ही त्यांनी केली. 

ठळक मुद्दे१४० गाव पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचार बाहेर काढून किडनीग्रस्तांना शासकिय मदत देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपातुर्डा : खारपाणपट्यातील किडणी आजार पूर्णत: निर्मूलन होईपर्यंत वारी वरुन होणा-या पाणी पुरवठा योजनेचा पाणीकर शासनाने भरावा असा इशारा माजीराज्यमंत्री सुबोध सावजी यांनी दिला आहे. १४० गाव पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचार काढून मुंबई अपघातग्रस्तांप्रमाणे किडनीग्रस्तांना शासकिय मदत द्यावी अशी मागणी ही त्यांनी केली. २१ ते २७ जानेवारी दरम्यान बुलडाणा शासकीय पाणीपुरवठा योजना भ्रष्टाचार निर्मूलन समितीने ६६ गावातील समस्या जाणून घेतल्या. या दौ-याचा समारोप २८ जानेवारी रोजी पातुर्डा येथे बक्षीपुरा नगिना मजीद समोर कार्यक्रम संपन्न झाला. पाणीपुरवठा योजनातील भ्रष्टाचार काढून पाणीकर शासनाने भरावा अशी मागणी सुबोध सावजी यांनी केली.यावेळी विष्णू पाटील, मोहन जाधव, प्रसेनजित पाटील, वा.रा. पिसे, अविनाश आकोटकार मंचावर उपस्थित होते. यावेळी विष्णू पाटील, मोहन जाधव, प्रसेनजित पाटील यांनी विचार मांडले. यावेळी सुबोध सावजी म्हणाले की, ९२ गावात वारीचे पाणी पोहचवणाºया अधिका-यांचा दावा सपशेल खोटा आहे. केवळ २ गावात पाणी पोहचले. पाण्याच्या दाबामुळे पाईप फुटत आहेत. लोकांना शुध्द पाणी मिळत नाही. जळगाव, संग्रामपूर तालुक्यातील जनता उपेक्षितांचे जिणे जगत आहे. मुंबई पुल दुर्घटनेत मरणा-यांना ५ त ७ लाख रुपये मिळतात याच राज्यात किडनी ग्रस्तांना वा-यावर सोडले जाते. किडनीग्रस्तांना उपचारासाठी मदत द्यावी. माझे आंदोलन सुरुच राहणार असून ६ फेब्रुवारीपर्यंत जळगाव तालुक्यात दौरा करणार असल्याचे सावजी यांनी सांगितले. यावेळी पांडुरंग वाघमारे, उकर्डा राऊत, मीर कुर्बान अली, प्रकाश देशमुख, शेख जफरोद्दिन, गोपाल उमाळे, संजय वानखडे, मिरानोद्दिन काझी, मोहन सोनोने, इरफार शहा, शत्रुघ्न अवचार, हसन ठेकेदार, डॉ.झाडोकार, मौलवी अन्सार, मौलवी अब्दुल्ला, पवन देशमुख, आबेदखा मौलाना, अमजतखा ठेकेदार, सिध्दार्थ गाढे, रहेमान कुरेशी, शालीग्राम ढोकणे, गुलाब सुभेदार, इब्राहीम कुरेशी, संतोष तायडे, दिनकर इंगळे, राकीब काझी, प्रभाकर वानखडे, शमा पटेल, हरुनखा, राजू इंगळे आदी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. आभार डॉ.अविनाश झाडोकार यांनी मानले. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाSubodh Savjiसुबोध सावजी