वाचन चळवळ गावागावात पोहोचवा : गरकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:36 IST2021-03-23T04:36:56+5:302021-03-23T04:36:56+5:30
साहित्यिक विनोद बोरे यांच्याशी वाचन चळवळीबाबत त्यांनी चर्चा केली. यावेळी त्यांनी बोरे यांच्या जिजाऊ निवासस्थानातील स्वप्नपूर्ती कार्यालयाला भेट दिली. ...

वाचन चळवळ गावागावात पोहोचवा : गरकल
साहित्यिक विनोद बोरे यांच्याशी वाचन चळवळीबाबत त्यांनी चर्चा केली. यावेळी त्यांनी बोरे यांच्या जिजाऊ निवासस्थानातील स्वप्नपूर्ती कार्यालयाला भेट दिली. यावेळी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन तहसीलदार गरकल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर गरकल यांचा पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या भागात सकारात्मक विचारांची चळवळ असणे गरजेचे होते. युवक उद्योग-व्यवसाय-अभ्यास किंवा मेहनतीकडे वळण्यासाठी प्रचंड ताकदीचे विचार अन् तेही उदाहरणांसह पुस्तकरूपात समाजासमोर मांडणे गरजेचे होते. हे काम बोरे यांच्याकडून झाल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी तहसीलदार गरकल यांनी नारायणराव बोरे, गोदावरी बोरे यांच्याशी संवाद साधला. कार्यक्रमाला सरपंच पती अनंथा बोरे, शेतकरी सुभाषराव बोरे, अर्चनाताई बोरे, प्रमोद बोरे, गणेश बोरे, पवन सातपुते उपस्थित होते.