महाजनादेश यात्रा ; स्वाभिमानीसह मनसेचे कार्यकर्ते स्थानबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 13:51 IST2019-08-24T13:50:54+5:302019-08-24T13:51:24+5:30
पोलिसांनी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्षांसह कार्यकर्त्यांना शनिवारी सकाळी ९.३० वाजता स्थानबद्ध केले आहे.

महाजनादेश यात्रा ; स्वाभिमानीसह मनसेचे कार्यकर्ते स्थानबद्ध
खामगाव: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा २४ आॅगस्टरोजी खामगाव शहरात दुपारी २ वाजता दाखल होत आहे. या सभेत तसेच महाजनादेश यात्रेत स्वाभिमानीचे कार्यकर्ते गोंधळ घालण्याच्या तयारी असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्षांसह कार्यकर्त्यांना शनिवारी सकाळी ९.३० वाजता स्थानबद्ध केले आहे.
यासंदर्भात स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात ९० लाख शेतकरी आजही पीकविमा पासून वंचित आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती पोलिसांना होती. त्यासाठी त्यांनी रीतसर पोलिसांना परवानगी देखील मागितली होती. परंतु पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वीच पोलिसांनी जिल्हाध्यक्ष कैलास फाटे सह स्वाभिमानीचे कार्यकर्ते, मनसेचे पदाधिकारी आनंद गायगोळ यांना ताब्यात घेतले आहे. जिल्हयातील इतरही ठिकाणी पोलिसांची धरपकड सुरु आहे.