बुलडाणा महावितरणच्या कार्यालयामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 13:01 IST2018-01-05T12:59:26+5:302018-01-05T13:01:19+5:30
बुलडाणा : कृषी पंपाचे कनेक्शन कापण्याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने गुरूवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले.

बुलडाणा महावितरणच्या कार्यालयामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ठिय्या
बुलडाणा : कृषी पंपाचे कनेक्शन कापण्याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम विदर्भप्रमुख राणा चंदन, अल्पसंख्याक आघाडीचे शे.रफिक शे.करीम, स्वाभिमानीचे तालुकाप्रमुख हरीभाऊ उबरहंडे यांच्या नेतृत्वात महावितरणच्या कार्यालयामध्ये शेकडो शेतकरी व संघटनेच्यावतीने गुरूवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी या ठिय्या आंदोलनामध्ये राणा चंदन, शे.रफिक शे.करीम, हरीभाऊ उबरहंडे, अमीन खसाब, समाधान धंदर, शाम पन्हाळे, अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष शेख वसीम बागवान, अल्पसंख्याक शहराध्यक्ष जावेद खान, कैलास बापू जाधव, पालकर महाराज, अविनाश डुकरे, अनिल पडोळ, एकनाथ उबरहंडे यांचेसह शेकडो शेतकरी बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.