स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्या बसच्या काचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 23:40 IST2018-12-31T23:39:54+5:302018-12-31T23:40:15+5:30
दुष्काळग्रस्त शेतक-यांना आर्थिक मदत व तुरीचे अनुदान देण्यात शासनाकडून दिरंगाई होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र रोष व्यक्त करीत संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ येथे बसची तोडफोड केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्या बसच्या काचा
बावनबिर : दुष्काळग्रस्त शेतक-यांना आर्थिक मदत व तुरीचे अनुदान देण्यात शासनाकडून दिरंगाई होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र रोष व्यक्त करीत संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ येथे बसची तोडफोड केली. ही घटना ३१ डिसेंबरच्या रात्री १० वाजता घडली.
बुलडाणा जिल्हयात यावर्षी दुष्काळजन्य आहे. अशा परिस्थितीत शेतक-यांना आर्थिक मदतीची गरज आहे. मात्र वारंवार आंदोलने, निदर्शने करूनही सरकारकडून शेतक-यांना आर्थिक मदत देण्यात चालढकल केली जात आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पावित्रा घेत ३१ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ येथे एम.एच.४०-वाय.५६४८ क्रमांकांच्या बसच्या काचा फोडल्या. याप्रकरणी चालक गोपाल सुरडकर यांनी संग्रामपूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस कारवाई सुरु होती. तोडफोड करण्यात आलेली बस जळगाव आगारात उभी आहे.