शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

उप माहिती कार्यालयातील एका कर्मचार्‍यावर निलंबनाची टांगती तलवार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 1:18 AM

खामगाव: येथील  उप माहिती कार्यालयातील दोन कर्मचार्‍यांवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. दरम्यान, यापैकी एका कर्मचार्‍यावर निलंबनाची टांगती तलवार कायम असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

ठळक मुद्देदोन कर्मचार्‍यांवर कारवाई प्रस्तावित

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: येथील  उप माहिती कार्यालयातील दोन कर्मचार्‍यांवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. दरम्यान, यापैकी एका कर्मचार्‍यावर निलंबनाची टांगती तलवार कायम असल्याची खात्रीलायक माहिती आहे.खामगाव येथील उपमाहिती कार्यालयाला गेल्या काही दिवसांपासून ‘बेशिस्ती’चे ग्रहण लागले आहे. कार्यालय उघडण्यात आणि बंद करण्यात वारंवार अनियमितता होत असतानाच, शासकीय कामकाजाच्या दिवशी खामगाव येथील उप माहिती कार्यालय चक्क दोन दिवस बंद होते. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी आणि मंगळवारी कार्यालय बंद असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर माहिती कार्यालयाच्या उप संचालकांकडून या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यात आली. दरम्यान, या चौकशीत तथ्य आढळल्यामुळे खामगाव येथील दोन कर्मचार्‍यांवर कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे. यामध्ये एकाचे निलंबन करण्यात येणार असून, एका कर्मचार्‍याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती आहे. निलंबनाची टांगती तलवार असलेल्या कर्मचार्‍याला यापूर्वीही बेशिस्तीमुळे निलंबित करण्यात आले होते, हे येथे उल्लेखनीय आहे.

खामगाववर बुलडाणा येथून नियंत्रण!उप माहिती कार्यालय उघडणे आणि बंद करण्यातील अनियमिततेसोबतच दोन दिवस कार्यालय बंद असल्याचे उघडकीस आल्यानंतर उप माहिती कार्यालयावर बुलडाणा येथून नियंत्रण ठेवल्या जात आहे. मंगळवारी बुलडाणा येथील सहा. माहिती नीलेश तायडे यांनी स्वत: हजर राहत येथील कामकाज सुरळीत केले.-

टॅग्स :zpजिल्हा परिषद