तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:50 IST2017-10-24T00:48:52+5:302017-10-24T00:50:00+5:30

संग्रामपूर: तालुक्यातील वकाणा येथील ३२ वर्षीय युवकाने  भिलखेड शिवारातील एका शेतकर्‍याच्या विहिरीत गळफास  घेऊन आत्महत्या केल्याची घटना २३ ऑक्टोबर रोजी  उघडकीस आली.

Suicide by taking a youthful rape | तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

ठळक मुद्देवाकाणा येथील घटनातरुणाने विहिरीत गळफास घेऊन केली आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर: तालुक्यातील वकाणा येथील ३२ वर्षीय युवकाने  भिलखेड शिवारातील एका शेतकर्‍याच्या विहिरीत गळफास  घेऊन आत्महत्या केल्याची घटना २३ ऑक्टोबर रोजी  उघडकीस आली. वकाणा येथील अरुण रामकृष्ण इंगळे (वय  ३२ वर्षे) या तरुणाने भिलखेड शिवारातील नारायण पुंडलिक  राऊत यांच्या शेतातील विहिरीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या  केली. या घटनेची फिर्याद आनंदा बाळकृष्ण इंगळे यांनी तामगाव  पोलिसात दिली. या प्रकरणी तामगाव पोलिसांनी अप नं. ३१/१७  कलम १७४ सीआरपीसीनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली  आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तामगाव पोलीस करीत आहेत.  

Web Title: Suicide by taking a youthful rape

टॅग्स :Crimeगुन्हा