लोकमत न्यूज नेटवर्कअमडापूर : चिखली तालुक्यातील करवंड येथील एका तरुणाने स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्मह त्या केल्याची घटना १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता उघडकीस आली आहे. याबाबत प्रकाश रामभाऊ राठोड (वय ४५) रा. करवंड याने अमडापूर पोलीस स्टेशनला माहिती दिली की, त्यांचा चुलतभाऊ मृतक विठ्ठल मोतीराम राठोड (वय २२) रा. करवंड याने स्व त:चे शेत गट नं.५४४ करवंड शिवारातील शेतातील निंबाच्या झाडाला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यावरून अमडापूर पो.स्टे.मध्ये र्मग नं.४१/0१७ कलम १७४ सी.आर.पी.सी.प्रमाणे नोंद घेऊन पुढील तपास ठाणेदार विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ शब्बीर पटेल हे करीत आहे. मृतकाने गळफास घेतल्याबाबतचे कारण समजू शकले नाही. याबाबत अधिक तपास ठाणेदार विक्रांत पाटील व कर्मचारी करीत आहेत.
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 01:22 IST
अमडापूर : चिखली तालुक्यातील करवंड येथील एका तरुणाने स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्मह त्या केल्याची घटना १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता उघडकीस आली आहे.
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
ठळक मुद्देचिखली तालुक्यातील करवंड येथील घटना शेतातील लिंबाच्या झाडाला घेतला गळफास