विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:18 IST2019-05-18T00:17:10+5:302019-05-18T00:18:19+5:30
घरात कोणीही नसताना एका शाळकरी मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. आरती आजिनाथ गर्जे (वय १६) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.

विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या
आष्टी : घरात कोणीही नसताना एका शाळकरी मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. आरती आजिनाथ गर्जे (वय १६) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.
तालुक्यातील खिळद येथील आजिनाथ गर्जे हे पनवेल येथे चालक म्हणून काम करतात. खिळद येथे त्यांची पत्नी, मोठी मुलगी आरती व तिच्या दोन लहान बहिणी राहतात. शुक्र वारी दुपारी आरतीची आई दवाखान्यात गेली होती. तर दोघी लहान बहिणी घराबाहेर खेळत होत्या. या वेळी आरतीने अचानक घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही.
अंभोरा पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद अंभोरा पोलीस ठाण्यात केली आहे.तपास एएसआय आजिनाथ लगड हे करत आहेत.