जामोद(जि. बुलडाणा) : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून येथील महादेव मारोती इंगळे या शेतकर्याने किटनाशक प्राशन करुन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. महादेव इंगळे यांच्यावर विदर्भ ग्रामीण बँक जामोद शाखेचे एक लाख रुपयांचे कर्ज असून, त्यांच्या पत्नीचे आजारपणामुळेही ते व्यथित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा आप्त परिवार आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2017 02:40 IST