शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
2
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
3
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
4
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
5
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
6
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
7
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
8
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
9
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
10
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
11
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
12
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
13
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
15
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
16
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
17
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
18
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
19
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
20
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार

ग्राहक सेवा केंद्र चालकाकडून खातेदारांना लाखोंचा गंडा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 1:17 AM

खामगाव :  खातेदारांचा विश्‍वास जिंकुन बँक ऑफ महाराष्ट्र   शाखा खामगावच्या घारोड येथील ग्राहक सेवा केंद्र चालक  भागवत आत्माराम साबळे याने खातेदारांना लाखो रूपयांनी गंडा  घातल्याचा प्रकार १६ ऑक्टोबर रोजी उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देबँक ऑफ महाराष्ट्रच्या खामगाव शाखेतील प्रकार २00 च्या वर खातेदारांना फसविले!

खामगाव :  खातेदारांचा विश्‍वास जिंकुन बँक ऑफ महाराष्ट्र   शाखा खामगावच्या घारोड येथील ग्राहक सेवा केंद्र चालक  भागवत आत्माराम साबळे याने खातेदारांना लाखो रूपयांनी गंडा  घातल्याचा प्रकार १६ ऑक्टोबर रोजी उघडकीस आला आहे.संजय गांधी निराधार योजना व पंचायत समिती अंतर्गत विशेष  घटक योजना तसेच मध्यम मुदती, अल्पमुदती व दीर्घ मुदती  असे लोखंडा, पाळा, घारोड, अकोली येथील खातेदारांचे  खामगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्रामधील दैनंदिन व्यवहाराचे  खाते आहेत. मात्र खामगाव शहर हे उपरोक्त सर्व गावांपासून  लांब अंतरावर असल्याने नागरिकांना दररोज पैशांचे व्यवहार  करण्यास अडचण निर्माण होत होती. म्हणून त्यांनी बँकेअंतर्गत  घारोड येथील ग्राहक सेवा केंद्राचा संचालक भागवत आत्माराम  साबळे यांच्याकडे खातेदारांचे व्यवहार सुरू केले होते. तो  दररोज नागरिकांना पैशांची देवाण घेवाण करून त्यांना घर  बसल्या विड्रॉल ने-आण करत होता त्यामुळे नागरिकांचा  त्यांच्यावर विश्‍वास बसला. तालुक्यामध्ये ग्रामीण भागातील  अनेकगावे विविध बँकेकडे दत्तक आहेत. त्यापैकी बँक ऑफ  महाराष्ट्रकडे असलेल्या गावांमधील अनेक खातेदार हे साबळे  याच्याकडे व्यवहार करत होते. मात्र त्याने नागरिकांच्या खा त्यामधून लाखो रूपयांची हेराफेरी करून सदर रक्कम आपल्या  खात्यात व नातेवाईकांच्या खात्यात वळती केली.लोखंडा येथील सौ.मिरा पुंडे यांच्या खात्यातून २२ हजार,  ज्ञानदेव पातोडे अकोली यांच्या खात्यातून २३८८८ रूपये,  जगदेव गव्हांदे रा. लोखंडा ८0 हजार रूपये व राजेंद्र  विनायकराव देशमुख यांच्या खात्यातून २ लाख ९७ हजार रू पयांचा उपहार करून सदर रकमा ह्या वेगवेगळ्या खात्यात  वळविल्या. दिवाळी असल्यामुळे खातेदार हे खामगाव येथे  खरेदीसाठी बाजारात आले होते. त्यांच्याकडे पैशांची कमतरता  असल्यामुळे आपले खातेचे पासबुक घेवून बँक ऑफ महाराष्ट्र  शाखा खामगावमध्ये १५ व १६ ऑक्टोबर रोजी गेले असता  त्यांना बँक कर्मचार्‍याने तुमच्या खात्यामध्ये पैसेच नाहीत तुम्ही  रकमा काढल्या आहेत, असे सांगितले. तेव्हा आपली  फसवणूक झाल्याचे खातेदारांच्या लक्षात आले. त्यामुळे या  केंद्राअंतर्गत सर्व खातेदारांनी बँकेत येवून चौकशी केली असता  त्यांच्याही खात्यातून रकमा इतरत्र वळविल्याचे उघडकीस आले  तर खातेदारांनी बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखा व्यवस्थापकास  सदर प्रकरणाबाबत विचारणा केली असता शाखाधिकारी यांनी  सर्वांचे पासबुक घेवून झालेल्या अपहाराची चौकशी सुरू केली  आहे. यासंदर्भात बँकेच्या शाखा व्यवस्थापकांशी संपर्क साधला अस ता त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्याचे मान्य केले.

२00 च्या वर खातेदारांना फसविले!सदरच्या खातेदारांची संख्या २00 च्या आसपास असून याबाबत  बँक प्रशासनाने यांसदर्भात शहर पोलिसात तक्रार दाखल केली  आहे. दरम्यान या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली  असून ग्राहक सेवा केंद्र संचालक फरार असल्याचे समजते.

टॅग्स :Crimeगुन्हा