शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात ऑटो, व्हॅन चालक, वाहकांचा संप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 15:32 IST

खामगावातील दीडशेच्यावर वाहन चालक आणि वाहक संपावर गेले असून दोन दिवस कामबंद आंदोलन पुकारले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बुलडाणाच्यावतीने उघडण्यात आलेल्या मोहिमे विरोधात खामगाव येथील ऑटो आणि व्हॅन चालकांनी दंड थोपटले आहे.आरटीओ कारवाईचा निषेध नोंदविण्यासाठी खामगावातील दीडशेच्यावर वाहन चालक आणि वाहक संपावर गेले असून दोन दिवस कामबंद आंदोलन पुकारले आहे. वाहन चालक आणि वाहकांच्या या कामबंद आंदोलनामुळे खामगाव शहरातील अनेक पालक वेठीस धरल्या जात असल्याचे चित्र आहे.विद्यार्थ्यांच्या सुरक्षीत वाहतुकीचा प्रश्न उपस्थित करीत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बुलडाणाच्यावतीने गत आठ दिवसांपासून जिल्ह्यातील स्कूल बस आणि विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या विविध वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. नियमबाह्य विद्यार्थी वाहतूक करणाºया वाहनचालक आणि वाहकांविरोधात दंडात्मक कारवाई केली जात आहे. या कारवाईमुळे विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया ऑटो, व्हॅन आणि इतर वाहन चालकांनी शनिवार पासून विद्यार्थ्यांची ने-आण बंद केली आहे. तर सोमवारी या वाहनचालक आणि वाहकांनी कडक बंद पुकारला. मंगळवारी देखील पुकारलेला संप सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. परिणामी, शहरातील अनेक पालकांना आपल्या पाल्यांची शाळेत ने-आण करावी लागत आहे.उपप्रादेशिक परिवहन विभागाने उघडलेल्या मोहिमेमुळे विद्यार्थी, त्यांचे पालक आणि वाहनचालक वेठीस धरल्या जात आहेत. कारवाई विरोधात मंगळवारी देखील बंद पुकारलेला आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाने कठोर कारवाई करू नये.- अजय मोटेवाहन चालक, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावStrikeसंप