जळगाव जामोदमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक, तरुण जखमी; पोलिसांचा हस्तक्षेप
By सदानंद सिरसाट | Updated: September 17, 2024 22:48 IST2024-09-17T22:47:35+5:302024-09-17T22:48:48+5:30
सदर घटना रात्री आठ ते साडे आठच्या दरम्यान चौभारा, वायली वेस या भागात घडली

जळगाव जामोदमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक, तरुण जखमी; पोलिसांचा हस्तक्षेप
सदानंद सिरसाट, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव जामोद (बुलढाणा): जळगाव जामोद शहरात विसर्जन मिरवणूक सुरू असताना येथील विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक झाल्याची घटना घडली. सुमारे अर्धा तास ही दगडफेक सुरू होती. यामध्ये काही तरुण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ठाणेदार निचळ व पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करित परिस्थिती नियंत्रणात आणली.
सदर घटना रात्री आठ ते साडे आठच्या दरम्यान चौभारा, वायली वेस या भागात घडली. या भागातील गणपती मंडळे विसर्जन मिरवणुकीत सामील झाली असताना आणि मिरवणुकपुढे सरकत असताना अचानक दगडफेक सुरु झाली. या दगडफेकीत काही तरुण जखमी झाल्याची माहिती आहे .अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक थोरात हे सुद्धा खामगाव वरून एस आर पी ची कुमक घेऊन जळगावला पोहचत एकूणच परिस्थितीचा आढावा घेत आहे.