पती-पत्नीस अडवून दीड लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 11:47 IST2021-08-01T11:46:46+5:302021-08-01T11:47:03+5:30

Road robbery : सोन्याची पोत, गोफ व अंगठ्या असा एकूण दीड लाखांचा ऐवज लूटून नेल्याची घटना ३१ जूलै रोजी सकाळी ९ वाजता येथील राष्ट्रीय महामार्गावर घडली.

Stolen the ornaments worth of Rs 1.5 lakh from husband and wife | पती-पत्नीस अडवून दीड लाखांचा ऐवज लंपास

पती-पत्नीस अडवून दीड लाखांचा ऐवज लंपास

नांदुरा : स्कुटीवरुन शेतात जाणाऱ्या पती-पत्नीला भर रस्त्यावर अडवून पतीला लोखंडी रॉडने जबर मारहाण करीत त्यांच्या जवळील सोन्याची पोत, गोफ व अंगठ्या असा एकूण दीड लाखांचा ऐवज लूटून नेल्याची घटना ३१ जूलै रोजी सकाळी ९ वाजता येथील राष्ट्रीय महामार्गावर घडली.  शहरातील डांगे नगर भागात राहणाऱ्या महिलेने नांदुरा पोलिसात तक्रार दिली. त्यामध्ये पती-पत्नी मलकापूर रोडवरील शेतात दुचाकीने जात असताना हॉटेल सह्याद्री समोर आरोपी राजेंद्र डांगे, दिग्विजय डांगे, राजेंद्र डांगे यांचा लहान मुलगा व त्याचा मित्र तसेच बुलढाणा येथील एक जण अशा एकूण ५ जणांनी चारचाकी गाडीमध्ये येऊन दुचाकीला अडविले. दिग्विजय डांगे याने लोखंडी रॉड पतीच्या डोक्यात मारला. आरडाओरड केली असता राजू डांगे याच्या लहान मुलाने चाकुचा धाक दाखवत ओरडू नको, असे म्हटले. तर बुलडाण्याच्या व्यक्तीने माझ्या गळ्यातील २० ग्रँमची सोन्याची पोत तोडली. तर राजेंद्र डांगे याने हात पकडून मला चार चाकी गाडीत नेण्याचा प्रयत्न केला. पतीला झालेल्या जबर मारहाणीमुळे त्यांना येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणले. 

Web Title: Stolen the ornaments worth of Rs 1.5 lakh from husband and wife