शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

नऊ महिन्यांत चोरीच्या घटना वाढल्या!

By admin | Updated: April 24, 2017 00:27 IST

पोलीस विभागाकडून ७७ विशेष मोहीम : २१७ तक्रारकर्त्यांना परतविले ४ कोटी २४ लाख रुपये

बुलडाणा : गत नऊ महिन्यात जिल्ह्यात चोरी व लुटमारीच्या बऱ्याच घटना घडल्या. या वाढत्या गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस विभागाने ७७ विशेष मोहिमी राबविल्या. यात २१७ तक्रारकर्त्यांकडून प्राप्त तक्रारीच्या आधारे कारवाई करुन चोरट्यांना गजाआड केले. या दरम्यान चोरट्यांकडून ४ कोटी २४ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो तपासाअंती तक्रारकर्त्यांना परत केला.बुलडाणा जिल्ह्यात गत काही महिन्यांपासून चोरी व लुटमारीच्या घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे. ही बाब गांभीर्याने घेत, पोलीस प्रशासनाकडून गस्त घालणाऱ्या पोलीस पथकाला विशेष सूचना देऊन सर्तक ठेवण्यात आले आहे. शिवाय वाढत्या गुन्हेगारी घटना थांबविण्यासाठी पोलीस प्रशासनाने जबाबदारी घेऊन अतिरिक्त पोलीस पथकही सज्ज ठेवले आहे.जिल्ह्यात नऊ महिन्यांपासून चोरीच्या बऱ्याच लहान-मोठ्या घटना घडल्या. या घटनांना मुळापासून संपविण्यासाठी पोलीस विभागाने ७७ विशेष मोहिमा राबविल्या. या दरम्यान २१७ नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्या. तक्रारीच्या आधारे तपासचक्र फिरवून सर्व चोरट्यांना गजाआड करण्यात आले. शिवाय ४ कोटी २४ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तपासअंती तक्रारकर्त्यांना परत देण्यात आला. अमरावती विभागात २२४ कारवायाअमरावती विभागातील या वाढत्या गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस विभागाकडून गत नऊ महिन्यात २२४ विशेष मोहीम आखण्यात आल्या. मोहिमेदरम्यान ६०२ नागरिकांनी पुढाकार घेत चोरी व लुटमारीच्या घटनाबाबत तक्रारी केल्यामुळे पोलिसांना गुन्ह्याचा छडा लावण्यास मदत मिळाली. या सर्व प्रकरणात पोलिसांकडून ७ कोटी ११ लाख ८१ हजार २८२ रुपयांचा माल जप्त करुन तो तक्रारकर्त्यांना परत करण्यात आला. जिल्ह्यातील सर्व पोलीस कर्मचारी व अधिकारी आपली जबाबदारी ओळखून काम करीत आहे. शिवाय विशेष मोहीम राबविल्यामुळे जिल्ह्यातील चोरी, लुटमारी व इतर गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यात पोलीस प्रशासनाला यश आले आहे.- संजयकुमार बाविस्कर, जिल्हा पोलीस अधीक्षक, बुलडाणा