शहरं
Join us  
Trending Stories
1
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
2
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
3
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
4
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
5
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
6
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
7
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
8
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
9
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
10
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
11
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
12
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
13
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
14
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
15
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
16
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
17
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
18
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
19
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय लोणार विज्ञान महोत्सव उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:46 IST

या महोत्सवाचे आयोजन राष्ट्रीय विज्ञान दिन व लोणार सरोवराचे संवर्धन या उद्देशाने केले होते. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश ...

या महोत्सवाचे आयोजन राष्ट्रीय विज्ञान दिन व लोणार सरोवराचे संवर्धन या उद्देशाने केले होते. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू यांनी केले तसेच या महोत्सवाच्या आयोजनमागचा उद्देश स्पष्ट केला. तसेच कोविड परिस्थितीमुळे हा महोत्सव ऑनलाईन घेतल्याचे सांगितले.

महोत्सवात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना डॉ. संजय ढोले (सिनेट सदस्य पुणे विद्यापीठ) म्हणाले की, लोणार सरोवरमध्ये अजून संशोधन होणे आवश्यक आहे. लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी आपले योगदान आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी विज्ञानातील क्षितिजे या विषयावर आपले विचार मांडले. यानंतर डॉ.काकासाहेब मोहिते (प्राचार्य सी. टी. बोरा महाविद्यालय शिरुर व माजी सिनेट सदस्य पुणे विद्यापीठ) यांनी विज्ञानयुगातील सुवर्ण दशक यावर भाष्य करताना, या कालावधीत लागलेल्या महत्त्वाच्या शोधाबद्दल माहिती सादर केली. डॉ. पंडित विद्यासागर यांनी हा‌ महोत्सव राष्ट्रीय स्तरावर नेण्याचा आशावाद व्यक्त केला. तसेच विज्ञान- तंत्रज्ञानाचा विकास करताना पर्यावरणाचे रक्षण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले. या महोत्सवाअंतर्गत चित्रकला, रांगोळी स्पर्धा (विषय -आपल्या कल्पनेतील लोणार सरोवर) निबंध स्पर्धा (विषय- लोणार सरोवराचा विकास आराखडा) आयोजित केला होता. त्यामध्ये विविध शाळा, महाविद्यालयांतील १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या महोत्सवाचे समन्वयक प्रा. कमलाकर वाव्हळ‌‌ यांनी आभार मानले तर . सौरभ प. गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. प्रमुख अतिथींची ओळख प्रा. डॉ. सूर्यकांत बोरूळ व प्रा. डॉ. महेंद्र भिसे यांनी करून दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.