शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
6
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
7
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
8
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
9
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
10
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
11
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
12
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
13
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
14
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
15
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
16
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
17
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
18
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
19
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
20
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई

एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे प्रवाशांची कुचंबणा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 1:28 AM

बुलडाणा: सातवा वेतन आयोग लागू करावा यासह इतर  मागण्यांसाठी एसटी कर्मचार्‍यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून संप  सुरू केल्यामुळे जिल्ह्यातील विविध बसस्थानकांवर शुकशुकाट  दिसून येत असून, बाहेरगावी जाणार्‍या प्रवाशांची दाणादाण  उडाली आहे.

ठळक मुद्दे५0 लाखांचा महसूल बुडाला जिल्ह्यातील १९५0 कर्मचारी संपात सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: सातवा वेतन आयोग लागू करावा यासह इतर  मागण्यांसाठी एसटी कर्मचार्‍यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून संप  सुरू केल्यामुळे जिल्ह्यातील विविध बसस्थानकांवर शुकशुकाट  दिसून येत असून, बाहेरगावी जाणार्‍या प्रवाशांची दाणादाण  उडाली आहे. या संपात जिल्ह्यातील १,९५0 कर्मचारी सहभागी  झाले असून, मंगळवारी संध्याकाळपर्यंत एसटी महामंडळाने  जवळपास २ लाख किलोमीटर प्रवास रद्द केल्यामुळे ५0 लाख  रुपयांचा महसूल बुडाण्याची माहिती आहे.सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह इतर मागण्यासाठी  एसटी मान्यताप्राप्त संघटनेने संपाची हाक दिली. त्यामुळे एसटी  महामंडळाचा संप सोमवारी रात्री १२ वाजेपासून सुरू झाला. या  संपात बुलडाणा जिल्ह्यातील २,५00 कर्मचार्‍यांपैकी कामावर  येणार्‍या १,९५0 कर्मचारी सहभागी झाल्यामुळे जिल्ह्यात  सकाळी १६ एसटीच्या फेर्‍या झाल्यानंतर एकही एसटी बसस् थानकाबाहेर पडली.  त्यामुळे संध्याकाळी ६ वाजेपर्यंत जवळ पास २ लाख किलोमीटरचा प्रवास रद्द झाल्यामुळे ५0 लाखांचा  महसूल बुडाल्याची माहिती आहे. दरम्यान, एसटी महामंडळाचा  संप असल्यामुळे प्रवाशांनी पर्यायी व्यवस्थेचा वापर केला. काही  प्रवाशांची खासगी गाड्यांद्वारे प्रवास करण्याचा निर्णय घेतला. सं प असल्यामुळे प्रत्येक बसस्थानकावर एसटी महामंडळाच्या  सुरक्षा रक्षकासह पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले होते.  त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकांवर शुकशुकाट दिसून  आला.बुलडाणा बसस्थानक परिसरात संपात सहभागी झालेल्या एसटी  कर्मचार्‍यांची सभा पार पडली. यावेळी एसटी कर्मचार्‍यांनी आ पले मनोगत व्यक्त करून मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरू  ठेवण्याचा निर्णय घेतला. यावेळी राष्ट्रीय ईपीएस ९५ नवृत्त  कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी  मार्गदर्शन करून पाठिंबा दिला. तसेच मागण्या मान्य होईपर्यंंत सं प सुरू ठेवण्याचे आवाहन केले.   

एसटी संपामुळे प्रवाशांची गैरसोयचिखली: प्रवाशांच्या सेवेसाठी असे अभिमानाने बिरूद  मिरविणार्‍या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी  आपल्या मागण्यांसाळी १६ ऑक्टोबरच्या मध्यरात्नीपासून  पुकारलेल्या संपाचे पडसाद १७ ऑक्टोबर रोजी दिसून आले.  ऐन दिवाळीच्या तोंडावर हा संप पुकारल्यामुळे स्थानिक चिखली  आगारात प्रवाशांना विविध संकटांचा सामना करावा लागला. तर  दुसरीकडे एसटीच्या संपाचा फायदा घेत खासगी प्रवासी वाहतूक  करणार्‍यांनी आपले उखळ पांढरे करून घेत प्रवास भाड्यात वाढ  केल्याने प्रवाशांची आर्थिक लूट होत असून, याचा सर्वाधिक  फटका ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. तर संपामुळे नेहमी  गजबजलेल्या बसस्थानकावर शुकशुकाट दिसून येत होता.  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला उन्हाळी सुट्यांपेक्षा अधिक  उत्पन्न हे दिवाळीच्या सुट्यांमध्ये मिळते. दिवाळी सणाला  प्रवाशांची संख्या खूप मोठय़ा प्रमाणात असते. एसटीला राज्याची  नस म्हटल्या जाते व एसटीने राज्यातील कानाकोपर्‍यात आपले  जाळे विणले आहे; मात्र संपामुळे हे जाळे विस्कळीत झाले  असून, याचा प्रचंड फटका व प्रवाशांना बसत असून, मोठय़ा  असुविधेचाही सामना करावा लागत आहे. तर संपामुळे प्रवाशांना  खासगी प्रवासी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे; मात्र त्याचा  लाभ घेत खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍यांनी प्रवास भाड्यात  वाढ केली असल्याने प्रवाशांना आर्थिक फटका बसत असला  तरी नाइलाजाने त्यांना खासगी वाहनातून प्रवास करावा लागत  होता. शिवाय क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी या वाहनातून नेल्या जात  असल्याने याचाही त्रास प्रवाशांना सोसावा लागत आहे. 

खामगाव आगाराचे सात लाखांचे नुकसान!खामगाव:  वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी राज्य परिवहन  महामंडळाच्या (एसटी) कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या बेमुदत सं पाला मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरुवात झाली. या संपामुळे  एसटीचे कामकाज ठप्प झाले असून, २0 हजार किलोमीटरच्या  ५२ फेर्‍या रद्द झाल्याने, खामगाव आगाराचे सुमारे सात लाख रु पयांचे पहिल्याच दिवशी नुकसान झाले. परिणामी, परिसरात  खासगी वाहतुकीने तोंड वर काढले असून, दिवाळीच्या गर्दीचा  लाभ या वाहतुकीला होत असल्याचे दिसून येते. एसटी  कर्मचार्‍यांच्या संपामुळे खामगाव आगारातून एकही बस  आगाराच्या बाहेर पडली नाही. परिणामी, बसस्थानकावरही  चांगलाच शुकशुकाट दिसून आला. बसस्थानकावर ताटकळत  असलेले प्रवासी मिळेल त्या वाहनाने जाण्याचा मार्ग शोधत होते.  एसटीच्या संपाचा मुहूर्त साधत खासगी वाहनधारकांनी आपल्या  प्रवासभाड्यात १0-२0 टक्के भाडेवाढ केल्याचे दिसून आले.  नाइलाजाने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. ऐन  दिवाळीत एसटी कर्मचार्‍यांच्या संपाचा चांगलाच फायदा,  खासगी प्रवासी वाहतुकीला झाल्याचे चित्र दिवसभर खामगाव  बसस्थानकावर होते. दरम्यान, संपामुळे बसस्थानकावरील  बसस्थानक प्रमुखांच्या कक्षाला कुलूप होते. तर चौकशी कक्षही  दिवसभर ओस पडला होता. तर बसस्थानकावर दिवसभर  शुकशुकाट दिसून आला.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ