शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी बसला खासगी बसची धडक, 13 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 18:04 IST

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात येत असलेल्या डोणगाव येथे एक मे रोजी पहाटे साडेपाच वाजता एसटी बसला खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसने पाठीमागून जबर धडक दिली

बुलडाणाबुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात येत असलेल्या डोणगाव येथे एक मे रोजी पहाटे साडेपाच वाजता एसटी बसला खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसने पाठीमागून जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये एसटी बसमधील १३ प्रवासी जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे जखमी झालेले १३ ही प्रवाशी गृहरक्षक दलाचे जवान असून असून निवडणुकीच्या बंदोबस्तावरून ते परत स्वगृही जात होते.हा अपघात डोणगावातील श्री विठ्ठल रुखमाई  शाळेजवळ घडला. ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथून वाशिमला एसटी बस (क्र. एमएच-४०-एन-९१६२) जात होती. दरम्यान याच वेळी पाठीमागून येणार्या खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या एमएच-०४-जी-८८१५ क्रमांकाच्या प्रवासी बसने एसटी बसला पाठीमागून जोरदारधडक दिली. एसटी बस ही या शाळेनजीक गतीरोधक असल्याने काहीसी कमी वेगात धावत होती. त्यावेळीच पाठीमागून आलेल्या खासगी प्रवाशी बसने  एसटी बसला ही जबर धडक दिल्याचे डोणगाव पोलिसांनी सांगितले.एसटी बसमध्ये निवडणुकीसाठी बंदोबस्तावर गेलेले गृहरक्षक दलाचे २३ जवान हे परतीचा प्रवास करत होते. या अपघातादरम्यान या २३ पैकी १३  जवान जखमी झाले आहेत. दरम्यान, या अपघात प्रकरणी एसटी बस चालकाच्या तक्रारीवरून खासगी प्रवासी वाहतूक करणार्या बसच्या चालकाविरोधात भरधाव वेगात वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल अरूण खनपटे हे करीत आहेत.विशेष म्हणजे डोणगाव येथे उभारण्यात आलेल्या गतीरोधकावर पांढऱ्या रंगाचे पट्टे मारलेले नाहीत. अर्थात इंडियन रोड कॉग्रेसने ठरवून दिलेल्या निकषामध्ये येथील गतीरोधक नसल्याने येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. या संदर्भातील वृत्त ‘लोकमत’ने २८ एप्रिल रोजीच्या अंगातच प्रसिद्ध केले होते. त्यानंतर अवघ्या दोन दिवसात या ठिकाणी अपघात झाला आहे. हा अपघातही औरंगाबाद-नागपूर या वर्दळीच्या महामार्गावर झाला आहे. या अपघातामध्ये एसटी बस व खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचेही मोठे नुकसान झाले आहे. बसमधील जखमी १३ जणावर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले.

टॅग्स :Accidentअपघातbuldhanaबुलडाणा