फवारणीच्या प्रात्यक्षिकासाठी अधिकारी थेट शेत बांधावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:24 AM2017-11-20T00:24:13+5:302017-11-20T00:25:48+5:30

शेतकर्‍यांना फवारणीचे प्रात्यक्षीक करून दाखविण्यासाठी   कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी  हिवरा आश्रम शिवारात जावून तूर पिकाची पाहणी  करून शेतकर्‍यांना करटकनाशक फवारणी विषयी मार्गदर्शन करण्यात आले.

Spraying demonstration officer directly on farm builds! | फवारणीच्या प्रात्यक्षिकासाठी अधिकारी थेट शेत बांधावर!

फवारणीच्या प्रात्यक्षिकासाठी अधिकारी थेट शेत बांधावर!

Next
ठळक मुद्देक्रॉपसॅप अंतर्गत उपक्रम फवारणीबाबत शेतकर्‍यांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरा आश्रम : मेहकर उपविभागामध्ये सोयाबीन व कापूस या पिकामध्ये तूर हे  महत्त्वाचे आंतर पीक असून सद्यस्थितीमध्ये फुले व शेंगा लागण्याच्या अवस्थेत  आहे. क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत कीड सर्वेक्षक व कीड नियंत्रक यांच्यामार्फत मेहकर उ पविभागामध्ये तूर व हरभरा पिकावरील कीड रोगाची पाहणी करण्यात येत आहे.  दरम्यान, शुक्रवारला शेतकर्‍यांना फवारणीचे प्रात्यक्षीक करून दाखविण्यासाठी   कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी  हिवरा आश्रम शिवारात जावून तूर पिकाची पाहणी  करून शेतकर्‍यांना करटकनाशक फवारणी विषयी मार्गदर्शन करण्यात आले. 
तूर हे उंच वाढणारे पीक असल्याने कीटकनाशकाची फवारणी करतांना विशेष  काळजी घ्यावी लागते, याबात कीड सर्वेक्षक यांच्याकडून प्रत्यक्ष शेतावर जावून शे तकार्‍यांना  किटकनाशक फवारणी करतांना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन  करण्यात आले आहे. 
यावेळी विवेकानंद कृषि महाविद्यालय  येथील प्राध्यापक  गजानन ठाकरे, कीड  नियंत्रक सुधाकर कंकाळ, कीड सर्वेक्षक जीवन नरवाडे, याकुब पठाण  हे उपस्थित  होते. ब्रह्मपुरी येथे पुरुषोत्तम देवकर यांच्या शेतात कीड सर्वेक्षक जीवन नरवाडे  यांनी प्रात्त्याक्षिक करून दाखविले व फवारणी करतांना संरक्षक कपडे, बूट, हात  मौजे, नाकावरील मास्क इत्यादीचा वापर करणेबाबत महत्व समजावून सांगितले.

अनोळखी किंवा रस्त्यावर विना परवाना किटकनाशकाची खरेदी करू नये.  किटकनाशके खरेदी करतांना परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावी. पूर्ण  हंगामाकरिता आवश्यक तेवढेच किटकनाशके खरेदी करावे.  
- गणेश भागवत गिरी, उपविभागीय कृषी अधिकारी मेहकर

Web Title: Spraying demonstration officer directly on farm builds!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती