सर्पदंशाने बैल दगावला
By Admin | Updated: August 19, 2014 23:16 IST2014-08-19T22:42:07+5:302014-08-19T23:16:52+5:30
वन्य प्राण्यामुळे पिकांना आणि जनावरांना धोका निर्माण होत आहे.

सर्पदंशाने बैल दगावला
चिखली : पावसाअभावी आधिच हवालदिल झालेल्या आहे. या अडचणीत भर म्हणजे वन्य प्राण्यामुळे पिकांना आणि जनावरांना धोका निर्माण होत आहे. येथील शेतकरी ङ्म्रीकिसन सिताफळे यांच्या गोठय़ात बांधलेल्या बैलाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. ही घटना १८ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. यामुळे सदर शेतकर्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
स्थानिक गजानन नगरमधील शेतकरी ङ्म्रीकसन रघुनाथ सिताफळे हे सकाळी बैलांना चारापाणी केल्यानंतर शेतात कोळपे सुरू असल्याने त्यांना सोडण्यासाठी गेले असता बैलाला सर्पदंश झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दरम्यान याबाबत सिताफळे यांनी सर्पमित्रांना माहिती दिली असता बाळू निळे, किशोर तेलगोटे यांनी तातडीने घटनास्थळी पोहचून पाहणी केली असता तेथे कोब्रा (नाग) जातीचा साप आढळून आला. सर्पमित्रांनी या सापाला अत्यंत शिताफीने जेरबंद केले. या घटनेत शेतकरी सिताफळे यांचा बैल दगावला आहे. ऐनवेळी बैल दगावल्याने शेतातील कामे खोळंबणार असून आधिच पावसाअभावी पिके वाळत चालली असताना बैल दगावल्याने सिताफळे यांचे सुमारे ३५ हजार रूपयांचे ऐन शेतीचे हंगामाचेवेळी नुकसान झाले. वन्यप्राणी शेतकर्याकडील जनावरांना करीत असल्याचे घटना सर्वत्र घडल आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.