स्मार्ट फोनसाठी मोलमजुरी!
By Admin | Updated: May 25, 2014 00:04 IST2014-05-24T23:55:26+5:302014-05-25T00:04:24+5:30
युवक अँन्ड्रॉईड मोबाईल खरेदीसाठी मोलमजुरी करत आहेत.

स्मार्ट फोनसाठी मोलमजुरी!
शेगाव : दिवसेंदिवस शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात इंटरनेटचे जाळे मोठय़ा प्रमाणात पसरत असताना ग्रामीण भागात इंटरनेट वापरणार्या युवकांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. पालकांकडून काहीही कारणे सांगून किंवा इतर उलाढाली करून युवक अँन्ड्रॉईड मोबाईल खरेदीसाठी मोलमजुरी करत आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी इंटरनेटचा निकाल आणि इतर माहिती मिळविण्यासाठी शहरात इंटरनेट कॅफेमध्ये गेल्याशिवाय पर्याय नव्हता. सायबर कॅफेत तासनतास चॅटिंग करणार्या युवक-युवतीही आता घरबसल्या मोबाईलवर दहा रुपयांपासून ते २00 रुपयांपयर्ंतचे रिचार्ज मारून तो संपेपयर्ंत चॅटिंग करण्यात मग्न आहेत. व्हॉटस्अँप, फेसबुकसाठी चांगला मोबाईल असावा, असे प्रत्येक युवक-युवतीला वाटत असल्याने अगदी पालकांना काहीही कारणे सांगून तसेच युवक वर्ग बांधकामावर गवंड्याच्या हाताखाली मोलमजुरी करून तर इतर ठिकाणी हमाली आणि बिगारी काम करीत आहेत.