शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

पितृपक्ष संपताच सहा अर्ज दाखल

By admin | Updated: September 26, 2014 00:14 IST

बुलडाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात २१५ अर्जांची विक्री.

बुलडाणा : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या पाचव्या दिवशी सातही विधानसभा मतदारसंघातून १२६ उमेदवारांनी २१५ उमेदवारी अर्ज नेले. तर सहा उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले. यामध्ये तीन विद्यमान आमदारांचा समावेश आहे. चिखली विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसचे उमेदवार म्हणून विद्यमान आमदार राहुल बोंद्रे यांनी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे नेते व माजी खासदार मुकुल वासनिक, जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाभरातील नेते उपस्थित होते. आ. राहुल बोंद्रे यांनी दोन अर्ज दाखल केले. जळगाव जा. मतदारसंघातून अपर्णा संजय कुटे यांनी एक, तर भारत इंगळे यांनी एक नामांकन दाखल केले. मेहकरमधून विठ्ठलराव ढाकरके यांनी एक अर्ज दाखल केला. सिंदखेडराजा, मेहकर आणि मलकापूर मतदारसंघातून आज एकही नामांकन नाही. दरम्यान, बुलडाणा मतदारसंघातून ११ उमेदवारांनी २१ अर्ज नेले. चिखलीतून २0 व्यक्तींनी ३0 अर्ज नेले. जळगाव जा.मधून १६ व्यक्तींनी ३५ अर्ज, खामगावमध्ये १५ व्यक्तींनी ३0 अर्ज, मेहकरमधून ४१ व्यक्तींनी ४१ अर्ज, सिंदखेडराजातून १७ व्यक्तींनी ४२ अर्ज आणि मलकापूर मतदारसंघातून सहा व्यक्तींनी १६ नामांकन अर्ज दाखल केले. बुलडाणा येथील शिवसेनेचे उमेदवार तथा विद्यमान आमदार विजयराज शिंदे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाचे उमेदवार म्हणून विद्यमान आमदार तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. संजय कुटे यांनी आज रॅली काढून आपली उमेदवारी दाखल केली. जळगाव जामोद मतदारसंघात आज भारिप-बमसंचे उमेदवार प्रसेनजित तायडे (पाटील) यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी धनंजय गोगटे यांच्याकडे सादर केला.