सिंदखेडराजा- जालना मार्गावर अपघातात महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 12:25 IST2020-11-11T12:25:10+5:302020-11-11T12:25:25+5:30

Accident News कमलबाई विजय विघ्ने ह्या मागच्या टायरखाली येऊन चिरडल्या गेल्या व त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Sindkhedraja: A woman was killed in an accident on Jalna road |  सिंदखेडराजा- जालना मार्गावर अपघातात महिला ठार

 सिंदखेडराजा- जालना मार्गावर अपघातात महिला ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
राहेरी बु: मोटार सायकलला साईड देणाऱ्या ट्रेलरखाली चिरडल्या जाऊन एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीस्वार युवक किरकोळ जखमी झाला. ही  घटना  ९ नोव्हेंबर राेजी दुपारी ४ वा. सुमारास येथून जालनाकडे जाणाऱ्या मार्गावर चांदणी तलावानजीक घडली आहे.कमलबाई विजय विघ्ने असे मृतक महिलेचे नाव आहे. सावखेड तेजन येथील स्वप्नील विजय विघ्ने हा त्याची आई कमलबाई विजय विघ्ने यांना दुचाकी क्र. एम. एच. २१ डी. आर. १६०३ ने जालना येथून घेऊन सावखेड तेजन या आपल्या गावाकडे जात होता.  सिंदखेडराजा येथील चांदणी तलावाजवळ असतांना जालनाकडे जाणाऱ्या एम. एच. २० इ. एल. ४३९१ हे जड ट्रेलर साईड देत असतांना चालकाने फक्त पुढचा भाग बाजूला घेतला. त्यामुळे मोटारसायकल  ट्रेलरच्या मागच्या भागाला धडकली. यामुळे झालेल्या अपघातात कमलबाई विजय विघ्ने ह्या मागच्या टायरखाली येऊन चिरडल्या गेल्या व त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर स्वप्नील हा किरकोळ जखमी झाला आहे. याप्रकरणी विलास अर्जुन विघ्ने ह्यांच्या तक्रारीवरुन सिंदखेडराजा पोलिसांनी ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शवविच्छेदनानंतर कमलबाई विघ्ने यांच्यावर सावखेड तेजन येथे रात्री ९.३० वा.  अंत्यसंस्कार करण्यात आले.   राहेरी पुलावरुन जड वाहतूक सुरूच असल्याने अपघता हाेत आहेत. 

Web Title: Sindkhedraja: A woman was killed in an accident on Jalna road