लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : सिंदखेडराजाचे आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या चारचाकी वाहनाची निंबाच्या झाडाला धडक बसून, झालेल्या अपघातामध्ये चालक जखमी झाल्याची घटना ७ फेब्रुवारीला मध्यरात्री बुलडाणा रोडवरील यशोधामनजिक घडली.आ. खेडेकर यांना घेण्याकरिता एमएच-२८-एजे-७७0७ या वाहनाद्वारे चालक गजानन कुल्ले मलकापूरकडे जात होता. दरम्यान, त्यांच्या वाहनाला अपघात घडला. या बाबीपासून अनभिज्ञ असलेले आमदार खेडेकर रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर चालक न दिसल्याने त्याच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला; परंतु त्यांना कसलाच प्रतिसाद न मिळाल्याने ते अँड. साहेबराव सरदार यांच्या वाहनाने बुलडाण्याकडे रवाना झाले.८ फेब्रुवारी रोजी पहाटे त्यांचे वाहन अपघातस्थळी क्षतिग्रस्त आढळून आले. याची माहिती मिळताच खा. प्रतापराव जाधव यांचे स्वीय सहायक डॉ. गोपाल डिके व शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे यांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमी चालकास रुग्णालयात दाखल केले.
सिंदखेडराजाचे आमदार डॉ. शशिकांत खेडेकरांच्या वाहनाला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:46 IST
मलकापूर : सिंदखेडराजाचे आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या चारचाकी वाहनाची निंबाच्या झाडाला धडक बसून, झालेल्या अपघातामध्ये चालक जखमी झाल्याची घटना ७ फेब्रुवारीला मध्यरात्री बुलडाणा रोडवरील यशोधामनजिक घडली.
सिंदखेडराजाचे आमदार डॉ. शशिकांत खेडेकरांच्या वाहनाला अपघात
ठळक मुद्देमध्यरात्रीची घटना; चालक जखमी