प्रसूती कक्षात मोबाईलवर केले शुटिंग; गुन्हा दाखल
By Admin | Updated: June 3, 2017 00:42 IST2017-06-03T00:42:00+5:302017-06-03T00:42:00+5:30
खामगाव : येथील सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू व प्रसूती कक्षात महिलांचे मोबाइलवर शुटिंग काढून विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

प्रसूती कक्षात मोबाईलवर केले शुटिंग; गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : येथील सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू व प्रसूती कक्षात महिलांचे मोबाइलवर शुटिंग काढून विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील सती फैल भागातील रहिवासी असलेल्या कैलास चव्हाण याने गुरुवारी रात्री सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू प्रसूती कक्षात येऊन महिलांची मोबाइलवर शुटिंग काढली. यावेळी परिचारिका व सुरक्षारक्षकांनी हटकले असता कैलास चव्हाण याने परिचारिका व सुरक्षारक्षकास शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वानखडे यांच्यातर्फे सुरक्षारक्षक पुरुषोत्तम काळे यांनी शहर पोलीस स्टेशनला उपरोक्त आशयाची फिर्याद दिली. या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी कैलास चव्हाण याच्याविरुद्ध कलम ३५४ (क), ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.