शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
2
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
3
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
4
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
5
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
6
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
7
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
8
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
9
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
10
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
13
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
14
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
15
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
16
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
17
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
18
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
19
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
20
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! चौथीच्या विद्यार्थ्याला काळेनिळे पडेपर्यंत मारले, प्रश्नाचे उत्तर न दिल्याने बुलढाण्यातील शिक्षकाने दिली शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 18:45 IST

बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विद्येचे मंदिर मानल्या जाणाऱ्या शाळेत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विद्येचे मंदिर मानल्या जाणाऱ्या शाळेत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रश्नाचे उत्तर न आल्याच्या कारणावरून एका शिक्षकाने चौथीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला लोखंडी पट्टीने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

भारतातून परतताच UAE च्या राष्ट्रपतींचा पाकिस्तानला दे धक्का! शहबाज शरीफ यांची झोप उडाली

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगाव राजा येथील नारायण देविदास इंगळे यांचा मुलगा पवन (वय १०) हा जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीत शिक्षण घेत आहे. शाळेच्या वेळेत आरोपी शिक्षक विशाल रवींद्र चिम यांनी पवनला वर्गात प्रश्न विचारला. मात्र प्रश्नाचे उत्तर न आल्याने संतप्त झालेल्या शिक्षकाने ताळतंत्र सोडत लोखंडी पट्टीने पवनच्या पाठीवर, मांडीवर आणि हातावर सपासप मारहाण केली.

शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल

मारहाणीमुळे पवनला गंभीर दुखापत झाली. मुलाच्या अंगावरील जखमा पाहून पालकांच्या अंगावर शहारे आले. वडील नारायण इंगळे यांनी तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. वैद्यकीय तपासणीत मारहाणीची स्पष्ट पुष्टी झाल्यानंतर पिंपळगाव राजा पोलीस यांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१) तसेच बाल न्याय अधिनियम कलम ७५ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

या प्रकारानंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, संबंधित शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिक आणि पालकांकडून होत आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Teacher brutally beats student for wrong answer; outrage ensues.

Web Summary : A teacher in Buldhana severely beat a fourth-grade student with an iron rod for failing to answer a question. The student sustained serious injuries, leading to a police complaint and widespread condemnation of the teacher's actions. An investigation is underway.
टॅग्स :buldhanaबुलडाणाTeacherशिक्षक