शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

आश्रमशाळा विद्यार्थ्यांसाठी शिक्षणमित्र संकल्पना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 11:50 IST

Khamgaon News : अतिदुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी शिक्षणमित्र ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क    खामगाव : कोरोनामुळे येत्या शैक्षणिक वर्षात आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आदिवासी विकास विभागाकडून नवीन शैक्षणिक वर्षात ‘अनलॉक लर्निंग दोन’चे नियोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत दुर्गम, अतिदुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी शिक्षणमित्र ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शैक्षणिक क्षेत्रात ‘ऑनलाइन लर्निंग’, ‘स्टडी फ्रॉम होम’ अशा विविध संकल्पना राबविण्यात आल्या. मात्र इंटरनेट कनेक्टिव्हिटी, तंत्रज्ञानाचा अभाव, भौगोलिक प्रतिकूल परिस्थिती यामुळे या संकल्पनांना खोडा बसला होता. गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेता यातील त्रुटी दूर करून विद्यार्थ्यांपर्यंत नियमितपणे शिक्षण पोहोचत रहावे यासाठी आदिवासी विकास विभागानेदेखील कंबर कसली आहे.आदिवासी विकास विभागाकडून चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळांमधील विद्यार्थी हे दुर्गम, अतिदुर्गम भागातील असल्याने त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहचविण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात. आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत सहज व सातत्यपूर्ण शिक्षण पोहोचत राहावे यासाठी नवीन शैक्षणिक वर्षात ‘अनलॉक लनिंग दोनमध्ये शिक्षणमित्र’ ही संकल्पना आदिवासी विकास विभागाकडून राबविली जाणार आहे. या संकल्पनेंतर्गत गावातील बारावी उत्तीर्ण किंवा त्यापेक्षा पुढील शिक्षण झालेल्या गावातील एका तरुणाची किंवा विद्यार्थीसंख्येच्या प्रमाणानुसार एकापेक्षा अधिक तरुणांची शिक्षणमित्र म्हणून नेमणूक केली जाणार आहे. हे शिक्षणमित्र शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील दुवाचे काम करणार आहेत. एका गावात विविध आश्रमशाळेतील शिक्षण घेणारे विद्यार्थी राहत असतात. शिक्षणमित्र अशा विविध आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना एकत्रित करून शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षकांनी उपलब्ध करून दिलेल्या शैक्षणिक साहित्याचा वापर करून गावातील विद्यार्थ्यांकडून अभ्यास व स्वाध्याय करवून घेणार आहे. शिक्षणमित्राला आदिवासी विकास विभागाकडून दोन हजार रुपये मासिक मानधन व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. साधारणपणे जून ते सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमता विकसित करण्यावर भर देण्यात येणार असून, मोठ्या वर्गांना गणित, विज्ञान, इंग्रजीचे अध्यापन अनलॉक लर्निंग दोनमध्ये केले जाणार आहे. आवश्यकतेनुसार मराठी भाषेचेदेखील अध्यापन केले जाईल. अनलॉक लर्निंगसाठी प्रकल्प स्तरावर शैक्षणिक साहित्य तयार करून १५ जूनपर्यंत पुरवठा करण्याचे नियोजन केले गेले आहे. दरम्यान, १५ जूनपासून अनलॉक लर्निंग दोन सुरू होणार आहे. यासाठी आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांचा लसीकरणचा अहवाल सादर करणे शाळांना बंधनकारक करण्यात आले आहे.  

टॅग्स :khamgaonखामगावSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र