शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

अमेरिकेतील नोकरी सोडून शेळीपालन व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:49 IST

कृषिशास्त्रातील पदवी मिळविल्यानंतर थेट  अमेरिकेत उच्च शिक्षण घेऊन डॉक्टरेट (पीचडी)  मिळविली आणि तेथेच शास्त्रज्ञ म्हणून ‘डॉलर’ कमवून  देणारी नोकरीही मिळाली; मात्र या सर्व बाबींचा मोह  टाळत गाव गाठून शेळीपालनाचा व्यवसाय सुरू  करण्याचे धाडस चिखली येथील डॉ.अभिषेक भराड या  तरुणाने केले आहे.

ठळक मुद्देडॉक्टरेट मिळविलेल्या अभिषेक भराड यांची यशोगाथापहिल्याच वर्षी तीन लाखांचा नफा

लोकमत प्रेरणावाटसुधीर चेके पाटील। लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : कृषिशास्त्रातील पदवी मिळविल्यानंतर थेट  अमेरिकेत उच्च शिक्षण घेऊन डॉक्टरेट (पीचडी)  मिळविली आणि तेथेच शास्त्रज्ञ म्हणून ‘डॉलर’ कमवून  देणारी नोकरीही मिळाली; मात्र या सर्व बाबींचा मोह  टाळत गाव गाठून शेळीपालनाचा व्यवसाय सुरू  करण्याचे धाडस चिखली येथील डॉ.अभिषेक भराड या  तरुणाने केले आहे. त्यांच्या या धाडसाचे आज चीज  झाले असून, त्यांनी साखरखेर्डा येथे सुरू केलेल्या शेळी पालन व्यवसायातून पुन्हा एकदा शेती श्रेष्ठ, मध्यम व्या पार आणि कनिष्ठ नोकरी, ही म्हण खरी ठरली आहे.विदेशातील जीवनशैली अंगीकारली की गलेलठ्ठ पगार,  तिथली सुबत्ता, आर्थिक स्थैर्य, स्वच्छता हे सर्व भुरळ  घालणारे असते. शिवाय, अशा वातावरणात वाढलेल्या  व्यक्तींना ‘हेच खरे आयुष्य’ असे वाटू लागते. यामुळे  स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा, स्वत:साठी काम  करायचे असे तरुणपणात पाहिलेले अनेकांचे स्वप्न हे  स्वप्नच राहते. त्यातच ही नोकरी जर थेट अमेरिकेत  ‘डॉलर’ कमवून देणारी असेल तर.. तर ती सोडून गावी  परतण्याचा साधा विचारही कोणाच्या मनात डोकावणार  नाही; मात्र चिखली येथील सिंचन विभागातून सेवानवृत्त  झालेले अभियंता भागवत भराड यांचे सुपुत्र डॉ.अभिषेक  भराड यांनी हे सर्व त्यागून गावी जाऊन व्यवसाय  करण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अमेरिकेतील  शास्त्रज्ञ पदाच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि शेती  करण्यासाठी त्यांनी थेट साखरखेर्डा गावाची वाट धरली. डॉ.अभिषेक भराड यांनी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी  विद्यापीठ अकोला येथे बीएससी अँग्री हे पदवी शिक्षण  पूर्ण केल्यानंतर अमेरिकेतील ल्युसीयाना स्टेट विद्यापीठा तून मास्टर्स (एम.एस.) आणि डॉक्टरेट (पीच.डी.) चे  उच्च शिक्षण घेतले व याच विद्यापीठात शास्त्रज्ञ म्हणून  दोन वर्षे नोकरीदेखील केली; मात्र इथल्या मातीशी  असलेली नाळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. डॉलर  कमवून देणारी गलेलठ्ठ पगाराची नोकरी असूनही ते  समाधानी नव्हते. शेतकरी कुटुंबातून असल्याने तसेच  कृषिशास्त्रातील उच्च शिक्षण घेतले असल्याने आपल्या  जन्मभूमीतच आणि याच क्षेत्रात काहीतरी वेगळे  करण्याच्या इच्छेने त्यांना परत गावाकडे येण्यास भाग  पाडले आणि त्यांनी अमेरिकेतील नोकरीचा राजीनामा  दिला. दरम्यान, चिखली येथे आल्यानंतर आपल्या  कुटुंबीयांशी चर्चा करून साखरखेर्डा येथे ‘गोट फार्म’  सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली. यास कुटुंबीयांनीही  त्यांना साथ दिली. 

पहिल्याच वर्षी तीन लाखांचा नफाडॉ.अभिषेक यांनी १२ लाख रुपयांची गुंतवणूक करून  शेतीपूरक व्यवसाय उभारला आहे. १२0 शेळय़ांपासून  सुरुवात त्यांनी केली होती. वर्षभरात त्यांची संख्या दुप्पट  झाली असून, आज रोजी त्यांच्याकडे २५0 शेळय़ा आहे त.  तर अवघ्या एका वर्षातच त्यांना यातून तब्बल १0  लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यातील सात लाख  रुपयांचा खर्च वजा केला असता तीन लाखांचा नफा  मिळाला.

उच्चशिक्षित असूनही शेतीत पायडॉ.अभिषेक भराड कृषी शिक्षणात बीएसस्सी, एम.एस.  आणि पीच.डी. आहेत. त्यांनी अमेरिकेतील ल्युसीयाना  स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये शास्त्रज्ञ म्हणून दोन वष्रे नोकरी  केली; मात्न तेथे त्यांचे मन रमले नाही. त्यांनी साखरखेर्डा  गावाचा रस्ता धरला व वेळ वाया न घालविता बंदिस्त  शेळीपालन सुरू करण्यासाठी पावले उचलली. शेळी पालनाची जबाबदारी त्यांनी स्वत: पेलली.

मोफत कार्यशाळेद्वारे प्रसारडॉ. अभिषेक यांनी आपल्या शिक्षणाचा इतरांनाही लाभ  व्हावा म्हणून ते शेतकरी कुटुंबातील अनेक सुशिक्षित  तरुणांना मार्गदर्शन करीत असतात. यासाठी त्यांनी  तरुणांचा एक गट स्थापन केला असून, या गटाच्या  माध्यमातून नियमितपणो त्रैमासिक मोफत कार्यशाळा ते  घेतात. तथापि, या व्यवसायातील इतर व्यावसायिकांना  क्रॉस ब्रिडिंगचे प्रशिक्षणदेखील देतात.