Sheep grazing in cotton field at buldhana district | पिकाला लागलेला खर्चही न निघाल्याने कपाशीत घातली मेंढरं 
पिकाला लागलेला खर्चही न निघाल्याने कपाशीत घातली मेंढरं 

- संतोष आगलावे

लोकमत न्यूज नेटवर्क 
बोरखेड :  यावर्षी झालेल्या जास्त पावसाने बागायती कपाशीचे उत्पादन निम्म्यापेक्षा घटल्याने पिकाला लागलेला खर्च सुध्दा निघाला नाही. पुढील रब्बीचे हरभरा गहू पिक घेण्याकरीता शेतकºयांनी उभ्या कपाशीच्या शेतात मेंढरं घातली. संग्रामपूर तालुक्यात यावर्षी सर्वात जास्त पाऊस पडल्याची नोंद शासन दरबारी आहे. त्यामुळे पिक फुलोºयावर व परीपक्व होण्याच्या अवस्थेत असताना अवकाळी पावसामुळे बागायती व खरीपाच्या सर्व पिकांची वाट लागली. संग्रामपूर तालुक्यातील वारखेड शेत शिवारात बागायतदार शेतकºयांनी थोडेफार पाणी असताना ठिंबकच्या सहाय्याने कपाशी काही जगविली. परिणामी रक्षाबंधन सणापासून दिवाळीपर्यंत नियमीत पडणाºया पावसामुळे कपाशीच्या झाडांच्या बोंड्या काळसर व पात्यांची जास्त प्रमाणात गळ झाली. तसेच एकरी दहा क्विंटल कपाशीचे उत्पादन दरसाल येणारे मात्र यंदा पाच क्विंटलच्या आत आले. बागायती कपाशीकरीता एकरी खर्च सुरूवातीपासून पूर्ण कपाशी घरात येईपर्यंत कमीत कमी एकरी अठरा हजार रूपयापर्यंत येतो. यातील कापसात ओलसर पणाचे कारण देत व्यापाºयांनी ३५०० रूपयापर्यंत कापूस खरेदी केला. अशा बिकट परिस्थितीमुळे शेतीला लागलेला खर्च निघाला नाही. तरी लोकांचे देणे, मुलांचे शिक्षण, लग्न व प्रपंच कसा चालवावा अशा पेच शेतकºयांसमोर निर्माण झाला. शासनाने ओल्या दुष्काळाची मदत हेक्टरी ८ हजार रूपये मंजुर करून शेतकºयांची चेष्ठा केली. तरी दुसरे पिक घेण्याकरीता वारखेड भागात बागायतदार शेतकºयांनी काळजावर दगड ठेवून कपाशीचे शेत मेंढपाळांना चराईकरीता देण्याची सुरूवात झाली आहे. तरी शासनाने शेतकºयांना भरीव आर्थिक मदत व सरसकट संपुर्ण कर्जमाफी देण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.  

Web Title: Sheep grazing in cotton field at buldhana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.