अल्पवयीन विद्यार्थिनींचा शिक्षकाकडून लैंगिक छळ

By निलेश जोशी | Updated: April 3, 2024 21:36 IST2024-04-03T21:36:33+5:302024-04-03T21:36:47+5:30

आरोपी शिक्षक फरार: मोताळा परिसरातील संतापजनक प्रकार

Sexual harassment of minor students by teacher | अल्पवयीन विद्यार्थिनींचा शिक्षकाकडून लैंगिक छळ

अल्पवयीन विद्यार्थिनींचा शिक्षकाकडून लैंगिक छळ

मोताळा : चौथ्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा एका शिक्षकाने लैंगिक छळ केल्याची संतापजनक घटना ३ एप्रिल रोजी मोताळा परिसरात समोर आली आहे. या प्रकरणी तक्रारीवरून शिक्षकाविरोधात बोराखेडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोराखेडी पोलिसात या प्रकरणी एकाने तक्रार दिली आहे. त्याची मुलगी व अन्य एक मुलगी मोताळा परिसरातील एका शाळेत चौथ्या वर्गात शिक्षण घेत आहेत. ३ एप्रिल रोजी सकाळी मुली शाळेत गेल्या होत्या. त्यावेळी शिक्षक दिलीप जाधव हा अल्पवयीन मुलींच्या अंगावरून वाईट उद्देशाने हात फिरवल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी संबंधित शिक्षकाविरोधात बोराखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, बुलढाणा उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील, ठाणेदार सारंग नवलकार व एपीआय राजवंत आठवले यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राजवंत आठवले व पोलिस कॉन्स्टेबल आकाश यादव हे करीत आहेत.

Web Title: Sexual harassment of minor students by teacher