अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 15:24 IST2019-10-05T15:24:18+5:302019-10-05T15:24:25+5:30
संबधित इसमाने त्या मुलीस धमकावून येथीलच सुप्रीम लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
शेगाव : शेगाव येथील म्हाडा कॉलनीतील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ३० सप्टेंबर रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
म्हाडा कॉलनीत राहणारी १७ वर्षीय कुमारिकेची याच भागातील एका मुलासोबत मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले असल्याने ही बाब मुलीच्या घरच्यांना कळली. त्यानंतर हे कुटूंब इतर ठिकाणी राहावयास गेले मात्र दोघांच्या मैत्रीत अंतर आले नाही. मुलाने तिला भ्रमणध्वनी वरून रात्री ९ वा भेटावयास बोलावले व तिला घेऊन त्याने पोबारा केला. भुसावळ येथे मुलाच्या मावशीच्या घरी तब्बल आठ दिवस राहून शेगांव येथे परत आले. नंतर पुन: भुसावळ येथे एका भाड्याची खोली घेऊन काही दिवस राहून परत शेगांव येथे एका सलमान नावाच्या घरी आसरा घेतला. मात्र संबधित इसमाने त्या मुलीस धमकावून येथीलच सुप्रीम लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलीस त्रास होत असल्याने तिचे आईने तिला स्थानिक सईबाई मोटे सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकारी यांनी पुढील उपचारासाठी अकोला सर्वोपचार रुग्णालयात पाठविले. वैद्यकीय अहवालानुसार संबंधित अल्पवयीन मुलगी तीन महिन्याची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.