देशी कट्ट्यासह सात जिवंत काडतूस जप्त, चाैघांना अटक; चाैघे फरार

By संदीप वानखेडे | Published: November 25, 2023 04:36 PM2023-11-25T16:36:12+5:302023-11-25T16:36:47+5:30

पाेलिसांनी देशी कट्यासह सात जिवंत काडतूस व इतर असा १४ लाख ३ हजार रुपयांचा एवज केला़.

Seven live cartridges seized with country knife, four arrested; All four are absconding | देशी कट्ट्यासह सात जिवंत काडतूस जप्त, चाैघांना अटक; चाैघे फरार

देशी कट्ट्यासह सात जिवंत काडतूस जप्त, चाैघांना अटक; चाैघे फरार

बुलढाणा : जळगाव जामाेद पाेलिस स्टेशन अंतर्गंत देशी कट्यांची खरेदी-विक्री करणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ नोव्हेंबर राेजी रंगेहाथ अटक केली़. यावेळी पाेलिसांनी चाैघांना अटक केली तर चारजण घटनास्थळावरून पसार झाले़. पाेलिसांनी देशी कट्यासह सात जिवंत काडतूस व इतर असा १४ लाख ३ हजार रुपयांचा एवज केला़.

अकाेला येथील मध्यस्थाच्यामार्फत पुणे येथील दाेघे जळगाव जामाेद पाेलिस स्टेशन अंतर्गंत गाेडाळा डॅम येथे देशी कट्टा खरेदीसाठी आले हाेते़. याविषयी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देशी कट्याचा खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरू असतानाच छापा टाकला़. यावेळी माेहम्मद अख्तर शेख मुश्ताक रा. वाशिम बायपास अकाेला, फहदखान फारुखखान रा. भवानीपेठ पुणे, ताैसिफ करीमखान रा. रविवारपेठ पुणे, रामसिंग भवानसिंग मुझाल्दा रा. निमखेडी ता. जळगाव जामाेद यांना अटक केली. तसेच इतर चारजण घटनास्थळावरून पसार झाले. पाेलिसांनी आराेपींकडून एक देशी कट्टा किंमत ३० हजार, ७ जिवंत काडतूस किंमत ३ हजार ५०० रुपये, कार किंमत १२ लाख व इतर साहित्य असा १४ लाख ३ हजार ५०० रुपयांचा एवज जप्त केला. ही कारवाई पाेलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

Web Title: Seven live cartridges seized with country knife, four arrested; All four are absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.