शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

मुलांना शाळेत पाठवायचे की नाही ?...पालकांमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 11:57 AM

शाळांकडून पालकांचे हमीमत्र घेण्यात येत असल्याने पालकांचा गोंधळ उडाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. कोरोना पाॅझिटिव्ह आढळलेल्या शिक्षकांच्या शाळा बंदच राहणार आहेत. दरम्यान, शाळांकडून पालकांचे हमीमत्र घेण्यात येत असल्याने पालकांचा गोंधळ उडाला आहे. आता शाळा सुरू झाल्यानंतर मुलांना शाळेत पाठवायचे की नाही, असा संभ्रम पालकांमध्ये निर्माण झाला आहे.कोरोना अद्याप संपला नाही; परंतु २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार असल्याने मुलांच्या आरोग्याची जबाबदारी स्विकारायची कुणी असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आपल्या पाल्यास शाळेत पाठविण्यासंदर्भात पालकाचा होकार किंवा नकार याबाबत हमीपत्र घेण्यात येत आहे. जिल्ह्यात पालकांकडून संमतीपत्र घेण्याची प्रक्रिया अद्याप पुर्ण झालेली नाही. आणखी दोन दिवसात सर्व पालकांच्या समंतीपत्र शाळांकडे प्राप्त होतील. त्यानंतर त्याचा संपूर्ण अहवाल माध्यमिक शिक्षण विभागाकडे येणार आहे. त्यामुळे तूर्तास किती पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यास संमती दिली हे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. पालकांच्या संमतीपत्राशिवाय मुलांना शाळेत प्रवेश देऊ नये, अशा सूचनाच शिक्षण विभागाने शाळेला दिलेल्या आहेत. त्यामुळे पालकांमध्ये सुद्धा आपल्या मुलांना शाळेत पाठविण्याची भीती आहे. त्यात शिक्षकांची आरटीपीसीआर कोरोना चाचणी करण्यात येत आहे. त्यामध्ये सुद्धा काही शिक्षक पॉझिटिव्ह आढळत आहेत. त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांमध्येही भीती वाढत आहे. 

मुलांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांचे हमीपत्र घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच त्याचा अहवाल येईल. ज्या शाळेतील शिक्षक पॉझिटिव्ह आले त्या शाळा बंदच राहणार आहेत.-किशोर पागोरे, उपशिक्षणाधिकारी, बुलडाणा.

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवावे की नाही हाच प्रश्न आहे. शाळांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची खबरदारी घेणेही आवश्यक आहे.-गजानन पवार, मेहकर.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळा