शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

बियाण्यांच्या दरात तफावत!

By admin | Updated: June 2, 2017 00:28 IST

शेतकरी अडचणीत : १ लाख १५ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची गरज

ब्रह्मानंद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात १ लाख १५ हजार क्ंिवटल सोयाबीन बियाण्याची गरज आहे. सोयाबीनला सध्या २५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. मात्र, सोयाबीनचे नामांकित कंपन्यांचे बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल मागे चार हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडे असलेले सोयाबीन व नामांकित कपंन्याच्या सोयाबीन बियाण्यात हजारो रुपयांची तफावत असल्याने शेतकऱ्यांचे खत व बियाण्यांचे नियोजन बिघडले आहे.जिल्ह्यात यावर्षी ७ लाख ४७ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सोयाबीनचे पीक सर्वाधिक असून, ३ लाख ६१ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्यात १ लाख १५ हजार क्ंिवटल सोयाबीन बियाण्याची गरज आहे; परंतु सध्या शेतकऱ्यांच्या मालाला अत्यल्प भाव असल्याने शेतकरी आपल्याकडे पेरणीच्या खर्चासाठी ठेवलेला माल विकून पेरणीही पूर्ण करू शकत नसल्याची परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झालेली आहे. गेल्या तीन वर्षांनंतर पहिल्यांदाच गतवर्षी सोयाबीनचे उत्पादन चांगले झाले. मात्र, सोयाबीनला भाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्याकडील सोयाबीन घरातच ठेवले. खरीप हंगामाच्या पेरणीच्यावेळी घरातील माल विकायचा व त्यावर पेरणीसाठी लागणारे खत, बी-बियाणे खरेदी करून पेरणीचा खर्च भागवायचा, अशी तयारी बहुतांश शेतकऱ्यांची असते; मात्र सध्या सोयाबीनला केवळ २५०० रुपये प्रतिक्ंिवटलपर्यंत भाव मिळत आहेत, तर नामांकित कंपन्याचे सोयाबीनचे बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिक्ंिवटल ३६०० ते ४ हजार रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागत आहेत. शेतकऱ्यांकडे असलेल्या सोयाबीनच्या भावात व नामांकित कंपन्यांच्या सोयाबीन बियाण्यांच्या भावात हजारो रुपयांची तफावत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यावर्षी शेतकऱ्यांचे अर्थचक्रच बिघडले असल्याने खरीप पेरणीच्या नियोजनावर त्याचा परिणाम जाणवत आहे. १ लाख ३६ हजार क्ंिवटल बियाण्याचे नियोजनजिल्ह्यात २०१७-१८ मध्ये ७ लाख ४७ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांच्या लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. खरीप हंगामाकरिता जिल्ह्यात पेरणीसाठी प्रस्तावित केलेल्या क्षेत्रावर सर्व पिकांच्या १ लाख ३६ हजार ५३९ क्विंटल बियाणे पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये महाबीज, राष्ट्रीय बियाणे निगम यांच्याकडील ३८ हजार ५८० आणि खासगी बियाणे कंपन्यांकडून ९७ हजार ९५९ क्विंटल बियाण्याचा समावेश आहे.पीक कर्ज वाटपात बँकांचा हात आखडता! राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँकांच्या थकबाकीदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे बँकानी पीक कर्ज वाटपात हात आखडता घेतला आहे. परिणामी खरिपासाठी खत व बियाण्याकरिता पै-पै जुळविण्यासाठी शेतकरी मेटाकुटीस आला आहे. यंदाच्या खरीप हंगामाच्या नियोजनावर अर्थचक्र बिघडल्याचा परिणाम झाला असल्याने शेतकऱ्यांना सावकारांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.